शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गलेलठ्ठ पगार, तरीही अपहाराची बुद्धी ?

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल संताप : जिल्हा बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही त्यांना अपहार करण्याची बुद्धी होतेच कशी?’ असा संतप्त सवाल बॅँकेचे ठेवीदार व ग्राहकांमधून केला जात आहे. दर तीन-चार महिन्यांतून असा एखादा प्रकार घडतच असल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकरी, बचत गटाच्या महिला यांसह सामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी शाखा असल्याने जिल्हा बॅँक ही सामान्य माणसाला आपली बॅँक वाटते; पण या बॅँकेत त्या पद्धतीने सेवा दिली जाते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा बॅँकेसमोर खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे आव्हान आहे. खासगी बॅँका थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देणे गरजेचे असताना तसे होत नाही. उलट अपहार करून ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब बॅँकेच्या दृष्टीने ‘चिंते’ची तर संचालकांच्या दृष्टीने ‘चिंतना’ची आहे. राज्यात कोणत्याही जिल्हा बॅँकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाहीत, तेवढे पगार कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. येथे कर्मचाऱ्यांना २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पगार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना बॅँकेत अपहार करण्याची बुद्धी सुचतेच कशी? गेल्या आठवड्यात राशिवडे (ता. राधानगरी) शाखेत एका कर्मचाऱ्याने दोन संस्थांनी भरावयास दिलेल्या रकमेचे चलन केले आणि ती परस्पर हडप केली. प्रथमदर्शनी तीन लाखांचा अपहार असला तरी बॅँकेतर्फे त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अपहाराचे अनेक प्रकार झाले आहेत; पण ते दडपण्याचे काम झाल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असूनही सामान्य माणसाच्या पैशांवर हात मारण्याची बुद्धी कर्मचाऱ्यांना होतेच कशी? बॅँक प्रशासनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करून त्यावर पडदा टाकण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याने पुन:पुन्हा असे प्रकार होत आहेत. बॅँकेचे संचालक पाच हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बॅँकेकडे ठेवी या फक्त विश्वासावर येतात; पण असे अपहाराचे प्रकार होत असतील तर ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, याचे भान संचालकांनी व त्यांनी लाडावून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरच अशा प्रवृत्तीला चाप बसेल. (प्रतिनिधी)