शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

ई-पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून परजिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यामुळे परजिल्ह्यातील वाहनातून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना ई-पास ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून परजिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यामुळे परजिल्ह्यातील वाहनातून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना ई-पास आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरून शहरात प्रवेशणाऱ्या प्रमुख नऊ तपासणी नाक्यांवर ई-पासची तपासणी आवश्यक आहे. पण प्रत्येक तपासणी नाक्यावर सकाळी व सायंकाळी पोलीस फौजफाटा दिसतो, पण तावडे हॉटेल चौक व्यतिरिक्त इतर नाक्यांवर ई-पास व्यतिरिक्त इतरच कागदपत्रांची व कारणांची चौकशी होते. त्यामुळे प्रवेशाचा ई-पास हा नावापुरताच आहे. ‘कोणीही शहरात यावे, अन्‌ टिकली मारून जावे’ अशीच प्रवेशाची अवस्था आहे.

जिल्ह्यात प्रवेशासाठी परजिल्ह्यातील वाहनधारकाला ई-पास अनिवार्य आहे. कोल्हापूर शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी १२ व सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पोलीस बंदोबस्त दिसतो. राष्ट्रीय महामार्गावरून अथवा कर्नाटक राज्याकडून येणाऱ्या वाहनांकडे ई-पासची तपासणी तावडे हॉटेल चौकात होते. तर ठिकाणी कोठे निघालात? लायसन्स आहे का? आदींचीही विचारपूस होते. दुपारी तर रणरणत्या उन्हात बंदोबस्तात पोलीस सावलीचा आसरा घेतात. त्यामुळे तोच मोका साधून अनेक वाहने बिनधास्त शहरात प्रवेशतात. कळंबा, उचगाव, आर. के. नगर तपासणी नाक्यावर तुरळक वाहतूक होती.

ई-पासचा विसर; कारण नाही पटले, पाठवले माघारी

शहरात प्रवेशणाऱ्या नऊ नाक्यांवरील पोलिसांना जणू ई-पासचा विसरच पडलाय! तेथे ई-पास नव्हे तर वाहन चालविण्याचे लायसन्स तसेच कशासाठी शहरात निघालाय? असेच प्रश्न विचारले जातात. वाहनधारकांकडे अत्यावश्यक कारण नसेल तर त्याला प्रवेश न देताच माघारी पाठविले जाते. पण अशावेळी वाहनधारक मागे फिरून पोलिसांना चकवा देत पर्यायी मार्गाचा वापर करून शहरात प्रवेशतातच.

नऊ नाके, ९३ पोलीस

शहरात प्रवेशणारे प्रमुख नऊ रस्ते आहेत. या ठिकाणी सकाळी व सायंकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो. दिवसा आणि रात्र पाळी अशा दोन टप्प्यात ९३ पोलीस कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्तासाठी आहेत. त्यामध्ये एक अधिकारी आहेतच. पण प्रमुख सहा नाक्यावर २४ तास पोलीस तैनात आहेत.

राधानगरी-कोल्हापूर (नवीन वाशी नाका)

राधानगरी ते कोल्हापूर राज्य मार्गावर कोल्हापूर शहरात प्रवेशताना नवीन वाशीनाका येथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दिवसभरात ७ व रात्री ४ जण पोलीस तैनात आहेत. येथे ई-पास तर सोडाच, रविवारी दिवसभरात पर जिल्ह्यातील एकही वाहन आले नसल्याचे बंदोबस्तावरील पोलीस प्रितम मिठारी यांनी सांगितले. दुपारपर्यंत येथून परत पाठवलेली वाहने श्री लॉनपासून चोरट्या मार्गाने शहरात प्रवेशतात. (फोटो नं. २५०४२०२१-कोल-वाशी नाका)

कसबा बावडा मार्ग (शिये नाका)

पुण्या-मुंबईहून शहरात प्रवेश करणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे शिये टोल नाका ते कसबा बावडा रस्ता होय. शिये टोल नाक्यावर दिवसपाळीत एक अधिकारी, सहा पोलीस तर रात्री पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आहे. जिल्हांतर्गत प्रवेशाला कसलीच बंदी नसल्याने या नाक्यावरील पोलीस कर्मचारी वाहनधारकाला अडवून केवळ चौकशी करतात. कुठून आलात तुम्ही, कुठे, कशासाठी निघालाय, असे विचारतात. प्रसंगी लायसन्स व गाडीची कागदपत्रे तपासतात आणि जा म्हणून सांगतात. येथे ना टेंपरेचर गन ना ऑक्सिमिटर. आरोग्याची कोणतीच तपासणी होत नाही.

तावडे हॉटेल चौकात वाहन परवान्याची तपासणी

तावडे हॉटेल-गांधीनगर चौकातून शहरात येणाऱ्या वाहनधारक, नागरिकांकडे ई-पास, वाहन परवान्याबाबतची कसून चौकशी सुरू होती. पास, परवाना नसल्यास आणि इतर वाहनांची चौकशी सुरू होती. चौकात शहर वाहतूक पोलीस विभागाचे सात कर्मचारी रविवारी तैनात होते. सातारा आणि बेळगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांची येथे तपासणी सुरू होती. ई-पास, वाहन परवाना आणि योग्य कारण नसल्यास त्यांचे वाहन जप्त केले जात होते. दुपारपर्यंत सात वाहनधारकांवर कारवाई केली.

कागल आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर चौकशी

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर कागलमध्ये आशियाई महामार्ग १४७ अडवून नव्याने झालेल्या आरटीओ तपासणी नाक्यातच जिल्ह्यात येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. येथे १५ पोलीस कर्मचारी दोन शिफ्टमध्ये रात्रंदिवस पहारा देत आहेत. मालवाहतूक व एमआयडीसी कामगारांना अडविले जात नाही. कोल्हापुरातील वाहनांना विचारणा करून खात्री झाल्यानंतरच सोडले. अन्यथा परत पाठविले जात असल्याचे दिसले. परजिल्हा व परराज्यातील वाहनांना तर फारच अत्यावश्यक कारण असेल तरच सोडले जात आहे. पण अद्यापही नागरिकांकडे ई-पास नसल्याचे दिसले. (२५०४२०२१-कोल-कागल ०१, ०२, ०३, ०४

फोटो : कागलमधील या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची अशाप्रकारे ओळखपत्र पाहून, कारणाची खात्री पटल्यावरच सोडले जात आहे.)

शाहू नाक्यावर खडा पहारा

महामार्गावरून प्रवेशणाऱ्या शाहू नाक्यावरही १२ शसस्त्र पोलीस, केएमटीचे कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तात आहेत. येथे वाहनचालकांची चौकशी करूनच शहरात प्रवेश दिला जातो. प्रवेशणाऱ्याच्या मेडीकल कारणाला डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शनचा सबळ पुरावा दिला नाही तर वाहनेही जप्त केली जात होती. दंडाच्या पावत्या फाडल्या.

(फोटो:२५०४२०२१-कोल-शाहू नाका ०१, ०२, ०३, ०४

फोटो ओळ : शाहू जकात नाक्यावर वाहनांची कसून चौकशी करूनच त्यांना पुढे मार्गस्थ केले जात आहे. अशाप्रकारे पोलिसांचा तेथे सशस्त्र पहारा दिसत आहे. विनापास येणाऱ्यांकडून दंडाची वसुलीही केली जात आहे.(छाया : नसीर अत्तार)

गगनबावडा- कोल्हापूर (फुलेवाडी नाका)

फुलेवाडी नाक्यावर परजिल्ह्यासह इतर तालुक्यातून शहरात येणाऱ्यांची चौकशी केली जाते. मात्र शहरात प्रवेशण्यासाठी इतरही मार्ग आहेत, तरीही पोलिसांच्या तपासणीमधून सुटण्यासाठी नागरिक वेगवेगळी कारणे सांगतात. त्यातील सर्वाधिक वैद्यकीय कारणांचा समावेश असतो. औषधाची चिठ्ठी, दवाखान्यातील जुनी फाईल आदी कारणांचा नुसता पाऊसच पडलेला असतो. फुलेवाडी नाक्यावर सकाळी अकरा पासून तपासणी होते, ई-पाससह कोणत्या कारणासाठी नागरिक फिरतात याची चौकशी केली जाते.

रत्नागिरी-कोल्हापूर (शिवाजी पूल)

केवळ अत्यावश्यक सेवेअंतर्गत नागरिकांना आंतरजिल्हा, तालुका, शहरात ये-जा करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने ई-पास वितरण केले. रविवारी दुपारी पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाजवळील तपासणी नाक्यावरून नागरिकांची शहरात बिनधास्तपणे ये-जा सुरू होती. पोलीस बंदोबस्तासाठी होते, पण त्यांनी उन्हाच्या तडाख्यामुळे चहाच्या टपरीचा आधार घेतला होता. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून बिनधास्तपणे नागरिक दुचाकी व चारचाकी घेऊन ये - जा करीत होते.

(फोटो : २४०४२०२१-कोल-पंचगंगा)

ओळी : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर असलेला तपासणी नाका असा रविवारी दुपारी मोकळा होता. वाहनधारक बिनधास्तपणे ये-जा करीत होते.