शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

कागलमधील शाळांना ई-लर्निंगची सुविधा

By admin | Updated: August 26, 2015 21:43 IST

इंडो-काऊंट कंपनीचा उपक्रम : नगरपालिकेच्या सात शाळांत प्रारंभ

कागल : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रसिद्ध अशा इंडो-कांऊट या कंपनीने या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा विडा उचलत नगरपालिकेच्या सर्व शाळांत‘ई-लर्निंग’ची सुविधा सुरूकेली आहे. कागल तालुक्यातील ४० सरकारी शाळांना या सुविधा देण्याचा मानस आहे. नगरपालिकेच्या सात शाळांमध्ये प्रत्यक्षात ई-लर्निंग शिक्षण सुरूझाले आहे.इंडो - काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड ही धागा आणि कापड उत्पादन करणारी कंपनी आहे. गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित वसाहतीत हे प्रकल्प सुरू आहेत. कंपनीने उत्पादित केलेल्या उत्पादनांना जगभर मागणी आहे. जगातील पहिल्या दहांमध्ये ही कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष अनिलकुमार जैन यांनी इंडो -काऊंट फौंडेशनची स्थापना केली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात कागल तालुक्यातील ४० शाळा निवडल्या आहेत. शहरातील नगरपरिषदेच्या सात शाळांना ही ‘ई-लर्निंग’ची सुविधा प्रदान केली आहे. ६७८ चा पडदा, प्रोजेक्टर, बॅटरी बॅकअप, इन्व्हर्टर आणि अभ्यासक्रम अशा जवळपास २५ हजार रुपये किमतीचे साहित्य, शुद्ध पाणी मिळणारे अ‍ॅक्वागार्ड १५००० रुपयांचा आणि २५0 रुपयांची स्कूल बॅग प्रत्येक विद्यार्थ्याला यांचा यात समावेश आहे. ई- लर्निंग अभ्यासक्रम ओकार्ड फौंडेशन, मुंबई यांनी तयार केला आहे. मराठी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतही हा अभ्यासक्रम बनविला आहे. या ई-लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना शिकविणे आणि समजून घेणे सोपे होणार आहे.ई-लर्निंग शिक्षण पद्धती आज खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळात उपयोगात आणली जाते. आपण जे शिकत आहोत ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पडद्यावर दिसत असल्याने त्यांना अभ्यासक्रमाचे आकलन होण्यास खूप मदत होते. इंडो-काऊंट फौंडेशनमुळे आता नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा लाभली आहे. - विष्णूपंत मगर, मुख्याध्यापकसंत रोहिदास विद्यामंदिर, कागल.‘ई-लर्निंग’अभ्यासक्रमपहिली ते सातवीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम संगणकाच्या साह्याने मोठ्या पडद्यावर सचित्र आणि प्रत्यक्ष लाईव्ह पद्धतीने मांडला आहे. उदाहरणार्थ, भूगोल विषय शिकविताना पृथ्वी आणि हवामानाची माहिती पाठ्यपुस्तकाप्रमाणे प्रत्यक्ष पृथ्वी, पाऊस, डोंगर, समुद्र यांचे लाईव्ह चित्रीकरण विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहते. तसाच प्रकार शेती, बाजार, कथा-कविता याबद्दल आहे.