शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

जिल्ह्यातील १३८ शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’

By admin | Updated: January 7, 2015 00:07 IST

दोन शाळांची निवड : कृतियुक्त अध्ययन कार्यक्रमअंतर्गत कार्यशाळा

कोल्हापूर : सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कृतियुक्त अध्ययन कार्यक्रम (एबीएल) हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १३८ शाळांची निवड करण्यात आली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये या कार्यक्रमांतर्गत ‘ई-लर्निंग’चे धडे दिले जाणार आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यशाळेत या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.ताराबाई पार्क येथील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या. प्रमुख उपस्थिती शिक्षणतज्ज्ञ जे. के. पाटील (पुणे), जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील, जि. प. सदस्य शहाजी पाटील, महेश पाटील, राहुल देसाई, आदींची होती.जि. प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी ई-लर्निंग पद्धती उपयुक्त असून, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघातून दोन शाळांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा यामध्ये समावेश असेल.शिक्षणतज्ज्ञ पाटील यांनी स्क्रिनद्वारे सादरीकरण करून उपस्थितांना या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामीण भागात बहुवर्ग अध्यापन पद्धती ही अतिशय कठीण बाब झालेली आहे. तमिळनाडूमध्ये ७५ टक्के प्राथमिक शाळा आपल्याचसारख्या परिस्थितीला तोंड देत होत्या. ही परिस्थिती बदलण्याकरिता अनेक शासकीय धोरणांनुसार प्रकल्प हाती घेऊन शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. तरीही त्याची अपेक्षित परिणामकारकता दिसून आली नाही. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा व माहितीचा उपयोग प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात केला गेला नाही. त्याचा परिणाम म्हणून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता कृतियुक्त अध्ययन कार्यक्रम (अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रोग्राम) उदयास आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, बाजीराव पाटील, सुरेश कांबळे, प्रा. देवानंद कांबळे, भाग्यश्री पाटील, मेघाराणी जाधव, आकांक्षा पाटील, आदींसह सर्व पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित होते. (प्रतिनिधी)एबीएल म्हणजे काय?एबीएल म्हणजे कृतीद्वारे शैक्षणिक क्षमतेची संपादणूक होणारी तांत्रिक पद्धत आहे. ज्ञानेंद्रियांद्वारे जे ज्ञान आपण मिळवितो, ते कालांतराने विसरू शकतो; परंतु जे आपण स्वत: कृतीद्वारे शिकतो, ते कायमस्वरूपी मनात पक्के राहते.