शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांवर हक्कभंग प्रस्ताव : क्षीरसागर

By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST

गणेशोत्सव मिरवणूक लाठीमार प्रकरण

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नागरिकांवर अमानुष लाठीमार करून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, पोलीस उपअधीक्षक वैशाली माने, पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर, मा. शा. पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यास दिरंगाई केली. याप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाल आणि तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यावर मंगळवारी अधिवेशनामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही उर्मट अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी सभागृहातील सर्वच सदस्यांनी गदारोळ केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी आमदार क्षीरसागर यांना हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याची अनुमती दिली. यावेळी आ. क्षीरसागर यांनी १८ सप्टेंबर २०१३ रोजीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पापाची तिकटी येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अचानक लाठीमार केला. त्यामध्ये लहान मुलांसह अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद देण्यासाठी ठाण्यात गेलो असता ती घेतली नाही. उलट माझ्यासह १५ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. या घटनेनंतर १९ आॅक्टोबर २०१३ रोजी पोलीस महासंचालक दयाळ व विशेष पोलीस महानिरीक्षक चव्हाण यांच्याकडे ज्योतीप्रिया सिंग, वैशाली माने, संजय कुरुंदकर, मा. शा. पाटील यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून बेकायदेशीर केलेली सर्व प्रकरणे पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रे पाठविली. परंतु कारवाईसाठी दिरंगाई केल्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकृत करावा, अशी मागणी केली. तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी स्वीकृत केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ाज्योतिप्रिया सिंग, वैशाली माने, संजय कुरुंदकरांसह मा. शा. पाटील यांना निलंबित करण्याची मागणी