म्हाकवे : आणूर (ता. कागल) येथील शाहू स्पोर्टसकडून खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८० मुले व ४० मुलींनी सहभाग घेतला.
आणूर-बानगे मार्गावर या स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. प्रत्येक स्पर्धेवेळी क्रीडा शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आनंदा तोडकर यांनी केले.
मुलांमध्ये ओंकार पन्हाळकर (इचलकरंजी) याने प्रथम तर विकास दोडगे (कोरोची) व विकास पाटील (अवचितवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये रोहिणी पाटील (गडहिंग्लज) हिने प्रथम तर आदिती खोत (चांदेकरवाडी) व ऋतुजा तळेकर (केनवडे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
१६०० मीटर धावणे मुले - ऋषिकेश किरुळकर (कोल्हापूर), ओमकार कुंभार (इचलकरंजी), प्रशांत चौगुले (म्हाकवे) यांनी अनुक्रमे यश मिळवले.
१६०० मीटर (गावगन्ना) मुले - गणेश खोत, रोहित आरडे, सौरभ चौगुले, अभिषेक लोहार यांनी अनुक्रमे यश मिळवले.
१५ वर्षाखालील मुले (१६०० मीटर) - चिन्मय बेनाडे, प्रणित माने, ओमकार माने, प्रथम पाटील यांनी अनुक्रमे यश मिळवले.
१२०० मीटर मुले - सोहम पाटील, प्रज्वल खोत, आदित्य परिट, संचित कापडे यांनी अनुक्रमे यश मिळवले.
१२०० मीटर मुली - तेजस्वी कापडे, संस्कृती सावडकर, समीक्षा खोत, पूर्वजा खोत यांनी अनुक्रमे यश मिळवले.
या स्पर्धेसाठी बाबासाहेब खोत, अशोक मतिवडे, सुनील पाटील, प्रभाकर कापडे यांनी परिश्रम घेतले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. के. बी. चौगुले (आणूर),पी. आर. पाटील (कौलगे), सुधीर बंडगर (आणूर), संजय हवालदार (म्हाकवे), विजय पाटील (आणूर) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.