शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

प्रस्थापितांना धूळ, नव्यांना गुलाल!

By admin | Updated: December 14, 2014 23:44 IST

प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे आज मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न.

अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ साल काही दिवसांतच काळाच्या पडद्याआड कायमचे लुप्त होत आहे. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे याचा अंदाज बांधणे तर अशक्यच; परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे आज मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न...!शाचे, राज्याचे व जिल्ह्याचे भवितव्य घडविणाऱ्या दोन महत्त्वाच्या निवडणुका व त्यांमध्ये मतदारांनी जागरूकपणे दिलेला कौल या मागच्या वर्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सगळ्यांत महत्त्वाच्या घडामोडी. त्यामुळे सगळे राजकारण त्याभोवतीच केंद्रित झालेले. या निवडणुकीत जे घडले तो पूर्वरंग होता. त्याचा उत्तररंग आता नव्या वर्षात होणाऱ्या गोकुळ, जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अन्य सर्व अशीच झाली. विरोधातील सगळ्यांनी ताकद एकवटूनही खासदार राजू शेट्टी यांनी आपला गड लीलया राखला. नेमके तसेच धनंजय महाडिक यांच्याबाबतीतही झाले. त्यांच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष हाच शत्रू होता; परंतु तरीही ते जिंकले. शिवसेनेतील फंदफितुरी त्यांच्या पथ्यावर पडली. विधानसभेला लोकांनी शिवसेनेला बळ दिले. १९५७ पासून पहिल्यांदाच जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. त्याला लोकांपेक्षा त्या पक्षाचे धोरण व उमेदवारांबद्दलची नाराजी हेच जास्त कारणीभूत ठरले. दोन्ही काँग्रेस नको असतील तर जो सक्षम पर्याय होता तो शिवसेनेचा. तो लोकांनी स्वीकारला. पी. एन. पाटील व सतेज पाटील यांचे पराभव काँग्रेसला जिव्हारी लागले. पी.एन. जिंकता-जिंकता हरले. सतेज पाटील यांना ‘कामाचा माणूस’ ही प्रतिमा विजयी करू शकली नाही. लोकसभेला ज्या शेट्टी यांना जनतेने लढवय्या नेता म्हणून निवडून दिले, विधानसभेला मात्र त्यांना धोबीपछाड दिला. याउलट राष्ट्रवादीचे खासदार महाडिक काँग्रेसच्या मदतीवर निवडून आले व विधानसभेला त्यांनी भाजपला मदत केली तरी लोकांनी त्यांनाच बळ दिले. आता नव्या वर्षात कोल्हापूर गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समिती या तीन महत्त्वाच्या शिखर संस्थांची निवडणूक होत आहे. त्याशिवाय भोगावती, कुंभी-कासारी, बिद्री आणि राजाराम सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीतील कुरघोडीच्या राजकारणाचे पडसाद तिथे उमटणार आहेत. ‘कुंभी-कासारी’मध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी झुंज होईल. त्याच्या उलट ‘बिद्री’मध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस व शिवसेना एकत्र असेल. ‘भोगावती’मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व शेकाप एकत्र असेल. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागेल. राजाराम कारखान्यात आमदार महादेवराव महाडिक यांचा वरचष्मा असला तरी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्यात कितपत भाग घेतात यावर कुणाची डोकेदुखी वाढणार हे ठरेल. (उद्याच्या अंकात : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्र)महापालिका व विधानपरिषदकोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये त्यानंतर डिसेंबरमध्ये विधान परिषदेची लढत होईल. सध्या आमदार महादेवराव महाडिक तिथे प्रतिनिधित्व करतात. महापालिकेत ताराराणी आघाडीची मोट बांधण्याचा महाडिक यांचा प्रयत्न राहील. त्यासाठी ‘दिल्ली टूर’ मधून पेरणी सुरु आहे.विश्वास पाटील