शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डमी’ अर्जातही घराणेशाही; निष्ठावंत वाऱ्यावरच

By admin | Updated: September 29, 2014 01:16 IST

विधानसभा निवडणूक; खळ-पोस्टर, घोषणांपुरतेच कार्यकर्त्यांचा वापर

राजाराम लोंढे / कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबर प्रत्येकाने आपला ‘डमी’ अर्ज दाखल केला आहे; पण यामध्ये कार्यकर्त्यांऐवजी घरातील व्यक्तींचाच भरणा अधिक दिसत आहे. पत्नी, मुलगा, भाऊ, आई यांचेच अर्ज ‘डमी’ म्हणून भरल्याने कार्यकर्ते आता केवळ खळ-पोस्टर व घोषणांसाठीच राहणार आहेत. कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्याला विशेष महत्त्व असते, किंबहुना कार्यकर्त्यांशिवाय निवडणूक हे समीकरणच जुळू शकत नाही. कार्यकर्त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना ग्रामपंचायत, विकास संस्था, दूध संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी संधी दिली जात होती. त्यामुळे सामान्य कुटुंबातील माणसाला सरपंच, पंचायत समितीचा सभापती ते थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत संधी मिळायची. पण, अलीकडील दहा-पंधरा वर्षांत निवडणुकीतील चित्रच पालटले आहे. ग्रामपंचायतीपासूच घराणेशाहीने शिरकाव केला आहे. जिल्हा पातळीवरील नेते जसे करीत आहेत, त्याची पुनरावृत्ती स्थानिक पातळीवरील नेतेही करू लागले आहेत. सरपंच, दूध संस्था, विकास संस्थांचा अध्यक्ष आपल्याच घरातील, जिल्हा परिषद नाही जमली, तर पंचायत समिती तरी घरात ठेवायचीच यासाठी नेत्यांचा प्रयत्न असतो. उमेदवारी नसेना, पण किमान पक्षांसह नेत्यांकडून सन्मानाची वागणूक तरी मिळावी, एवढीच अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. पूर्वी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत बहुतांश उमेदवार हे आपल्या अर्जासोबत आपल्या ‘विश्वासू कार्यकर्त्या’चा अर्ज (डमी) भरत होते; पण काळानुरूप नेत्यांबरोबर कार्यर्त्यांची निष्ठाही बदलत गेली. निष्ठेची जागा पैशांनी घेतल्याने राजकारणातील रंग बदलत गेले आहेत. सर्वच मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करताना त्याठिकाणी दुसरा ‘डमी’ म्हणून आपल्याच कुटुंबातील अर्ज दाखल केलेला आहे. कदाचित राजकीय दबावापोटी कार्यकर्ता माघार घेणार नाही या भीतीने की ‘विश्वासातील कार्यकर्ते’च नसल्याने कुटुंबातील ‘डमी’ अर्ज भरावे लागतात. हेच समजत नाही. हे चित्र पाहिले तर कार्यकर्ते केवळ खळ-पोस्टर व घोषणा देण्यापर्यंत राहील, हे मात्र निश्चित आहे.