शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

माती परीक्षण शेतीच्या आरोग्याचा आरसा, कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत कसा.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: July 2, 2024 16:44 IST

शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी जागृती नसल्यानेच तब्बल आठ तालुक्यांत नत्राचे प्रमाण कमी झाले

राजाराम लोंढेकोल्हापूर : उत्पादन खर्चात झपाट्याने वाढ होत असल्याने पिकांचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. पण, उत्पादन वाढीतील मूळ घटक म्हणजे जमीन असून, त्या जमिनीच्या आरोग्याची तपासणी कधी केली का? याकडे सोयस्कर दुर्लक्ष केले जाते. किमान दोन वर्षांतून एकदा आपल्या माती परीक्षण करून मातीची आरोग्य पत्रिका तयार करून घेतली पाहिजे. ही पत्रिकाच शेतीच्या आरोग्याचा आरसा असतो. शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी जागृती नसल्यानेच तब्बल आठ तालुक्यांत नत्राचे प्रमाण कमी झाले आहे.माणसाप्रमाणेच जमिनीचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. जादा उत्पादनाच्या स्पर्धेत जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. आपल्या जमिनीत कशाची कमतरता आहे? त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजण्यासाठी किमान दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून घेतले पाहिजे.

यावर्षी १४ हजार सँपलचे उद्दिष्टगेल्या वर्षभरात ८ हजार ६४१ सँपलची तपासणी करून शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड दिले आहे. यावर्षी १४ हजार सँपलचे उद्दिष्ट असून यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १० हजार २००, अन्न सुरक्षा अभियानमधून २ हजार ५००, सेंद्रिय शेतीमधून ५००, तर इतर योजनांमधून एक हजार मातीच्या सँपल तपासणी केली जाणार आहे.

जमिनीतील नत्र यामुळे कमी होतेसाधारणत: जिथे जास्त पाऊस पडतो आणि पाणी वाहून जाते त्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच गनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, आजरा तालुक्यात नत्राचे प्रमाण खूपच कमी दिसते.

माती परीक्षाची गरज का?जमिनीतील भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्र्व्यांची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता याचा अंदाज येतो. आरोग्यपत्रिका हातात आल्याने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळता येतो. भौतिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा पोत, कणांची संरचना, जलधारक क्षमता, आभासी घनता, सच्छिंद्रतेचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात नत्र, स्फूरद, पालशा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन व जैविक गुणधर्मात जीवाणू, बुरशी, गांढूळ, मुंग्या माहिती कळते.तालुकानिहाय जमिनीतील घटकांचे प्रमाणतालुका - नत्र - स्फूरद  - जस्त - लोह - तांबे - बोरॉन - सल्फरआजरा  - कमी - मध्यम - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरतागगनबावडा - कमी - अधिक - जास्त - कमतरता - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसेभुदरगड - कमी - जास्त - कमरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसेचंदगड - मध्यम - मध्यम - कमतरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसेगडहिंग्लज - कमी - मध्यम - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसेहातकणंगले - मध्यम - मध्यम - पुरेसे - कमतरता - पुरेसे - कमतरता - कमतरताकागल - कमी - मध्यम - कमतरता - कमतरता - पुरेसे - पुरेसे - पुरेसेकरवीर - कमी - अधिक - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसेपन्हाळा - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसेराधानगरी - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसेशाहूवाडी - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसेशिरोळ - कमी - जास्त - पुरेसे - कमतरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता

आमच्या विभागाच्या वतीने मातीच्या सँपल घेतोच, पण इतर शेतकऱ्यांनी किमान दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून घेतले पाहिजे. आरोग्य पत्रिकेनुसार आवश्यकता पाहून घटक दिले तर उत्पादन चांगले मिळू शकते. - रमाकांत कांबळे (जिल्हा मृद सर्व्हेक्षण व तपासणी अधिकारी, कोल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र