शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक         

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:58 IST

आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ

ठळक मुद्दे‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक

कोल्हापूर : आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले, यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचे प्रतिपादन राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक गुरूवारी झाली, यामध्ये पक्षाच्या धोरणानुसार आघाडीसोबत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महाडिक म्हणाले, भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे.  संविधान मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला सत्तेची मगुरूरी आली आहे. सरकारच्या कारभाराला सामान्य माणूस वैतागला असून समाजातील कोणाताही घटक समाधानी नाही. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई या मुद्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित होते, पण भाजपची मंडळी सर्जिकल स्ट्राईक करून लोकांच्या परिवर्तनाचा प्रयत्न करत आहे. 

संपतराव पवार म्हणाले, कष्टकरी-श्रमजिवी लोकांसाठी मैदानात उतरण्याची वेळ आली त्यावेळी उतरलो, त्यावेळी कोण बरोबर होता किती मते पडली हे महत्वाचे नव्हते. आताची परिस्थिती वेगळी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच धोक्यात आली आहे. मनुवादी प्रवृत्ती देशातून हद्दपार करण्यासाठी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला. आमची ताकद मर्यादीत असेल पण जी मदत होईल ती प्रामाणिकपणेच करू.  पुन्हा सर्जिकल स्ट्राईक शक्य  पाकिस्तानचे दहा सैनिक मारल्याचा दावा केला जातो, मग तेथील प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी एकही ओळ कशी आली नाही. ही निवडणूक केवळ सर्जिकल स्ट्राईक भोवतीच फिरवण्याचा डाव असून येत्या आठ-दहा दिवसात आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली. दोन्ही कॉँग्रेस उन्हातील ‘पुरोगामी’आम्ही आतापर्यंत तत्वज्ञान घेऊन चाललो, पुरोगामी विचार जोपासणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादीला आम्ही पाठींबा देऊन सत्तेवर बसवले. पण त्यांचे  उन्हात उभे राहिलेले पुरोगामीत्व आहे. वेळ पडलीतर सावळीत जाऊन प्रतिगाम्यासोबत राहू शकतात. असा टोलाही संपतराव पवार यांनी लगावला. ‘त्यांचे’ किती ऐकायचे ते ठरवातुम्हाला निवडणक जिंकायची आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आम्हाला कोणाचे वावडे नाही, उद्या  पटले नाहीतर तुमच्यासोबत नसेनही, समाजासाठी त्रास सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. पण काहीजण चुकीची माहिती सांगतील, त्यांचे किती ऐकायचे ते ठरवा, असे पवार यांनी कॉँग्रेस नेत्यांचे नाव न घेता इशारा दिला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर