शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

अंधश्रद्धेमुळे गेला महिलेचा जीव !

By admin | Updated: April 30, 2015 00:48 IST

भूतबाधेच्या समजुतीतून जादूटोणा : कोल्हापुरातील प्रकार; ‘अंनिस’ने रुग्णालयात केले होते दाखल

कोल्हापूर : ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून गेल्या दोन महिन्यांपासून धार्मिक स्थळी जादूटोण्याद्वारे वैद्याकडून उपचार करून घेणाऱ्या राजेंद्रनगर येथील ४५ वर्षांच्या महिलेला बुधवारी सकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सदस्यांनी नातेवाइकांचा विरोध झुगारुन खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला ही दोन महिन्यांपासून आजारी होती. उचक्यांमुळे ती मोठमोठ्याने किंचाळत होती. गरिबीमुळे तिला २७ एप्रिल रोजी नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस उपचार करून घरी नेले. पुन्हा ती वेड्यासारखे करू लागल्याने तिला ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून नातेवाइकांनी वैद्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी नातेवाईक तिला घेऊन ताराबाई रोड परिसरातील एका धार्मिक स्थळी घेऊन गेले. या ठिकाणी वैद्याने तिला अंगारा लावून पाणी शिंपडले. तिची प्रकृती अत्यवस्थ होती. वेदनेने तिला सरळ उभेही राहता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत नातेवाईक तिला रिक्षातून घरी घेऊन जात होते. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या गीता जाधव यांना हा प्रकार दिसला. महिलेची अवस्था पाहून त्यांना राहवले नाही. त्यांनी नातेवाइकांना ‘महिला खूप अशक्त झाली आहे, तिला रुग्णालयात दाखल करा, ती बरी होईल,’ असे सांगितले. यावेळी त्यांनी ‘तुम्ही काही सांगू नका. सगळीकडे फिरलो आहे; पण काही फरक पडलेला नाही,’ असे सांगून ते निघाले असता जाधव यांनी आपल्या वरिष्ठ सहकारी सीमा पाटील यांना बोलावून घेतले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विरोध केला; परंतु पोलिसांत तक्रार करणार असे दरडावताच नातेवाइक रुग्णालयात दाखल करण्यास तयार झाले. सीमा पाटील यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या सहकार्याने कदमवाडीतील रुग्णालयात तिला दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा उचकी लागून तिचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. (प्रतिनिधी) वेळेत उपचार झाले असते तर जीवदानवेळेत योग्य उपचार झाले असते तर महिलेला जीवदान मिळाले असते; परंतु नातेवाइकांच्या अंधश्रद्धेच्या हट्टापायी महिलेला आपला जीव गमावावा लागल्याची रुग्णालय परिसरात चर्चा होती.नेमका महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे निदान होण्यासाठी तिचा मृतदेह सीपीआरमध्ये विच्छेदनासाठी आणण्यात आला. याठिकाणी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.