शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या धास्तीमुळे तीन हजार कोटींचा प्रकल्प गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी रविवारी कोल्हापुरात केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आग्रह धरला; पण त्यांनी हात जोडत ‘कोल्हापूरचे नाव घेतले तर आहे तीपण गुंतवणूक न करता पळून जातील,’ असे सांगितल्याने माझाही नाइलाज झाला, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.कोल्हापुरात आयोजित केलेल्या ‘व्हिजन २०२५’ मध्ये संभाजीराजे म्हणाले, या विषयावर आतापर्यंत कोणी बोलायचे धाडस केले नाही; पण मला बोलावेच लागेल. कोल्हापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शाहू महाराजांची भूमी म्हणून कोल्हापूरची ओळख होती; पण अलीकडे झालेल्या काही घटनांमुळे कोल्हापूरला लोक घाबरत आहेत. दक्षिण कोरियातील एस्सान ग्रुपमधील उद्योजकांचे शिष्टमंडळ मुंबईत आल्याचे समजले. त्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रासह गुजरात व आंध्रप्रदेशची निवड केली होती. एका शहरात तब्बल तीन हजार कोटीची गुंतवणूक ते करणार असल्याने मी लागलीच त्यांची भेट घेतली. रात्री साडेबारा वाजता शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे, तर कोल्हापूरची त्यासाठी निवड करावी, असा आग्रह मी धरला.मुख्यमंत्र्यांनी मला अ‍ॅँटिचेंबरमध्ये घेऊन हात जोडत ‘कोल्हापूरचे तेवढे नाव काढू नका. शिष्टमंडळाला फार फोर्सही करू नका; नाही तर आहे ती गुंतवणूकही परत जाईल. तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. एकट्या कोल्हापूरचा विचार करू नका. देशातील प्रत्येक शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करता,’ असे सांगितले. यावर माझाही नाइलाज झाला; पण एवढी मोठी गुंतवणूक येऊ न शकल्याचे शल्य मनात कायम राहिले. त्यामुळे कोल्हापूरची तयार झालेली प्रतिमा बदलण्याचे धोरण आता आपल्याला स्वीकारावे लागणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.गुंतवणूकदारांमध्ये आकसगेल्या काही वर्षांत कोल्हापुरात टोलसारखी मोठी आंदोलने झाली. आंदोलनामुळे गुंतवणूकदारांमध्ये कोल्हापूरविषयी आकस तयार झाला आहे. याचे प्रत्यंतर वारंवार येत आहे; पण उघडपणे कोणी बोलत नव्हते.मध्यंतरी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील आपल्यालाही असा अनुभव आल्याचा एके ठिकाणी ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर आता खासदार संभाजीराजे यांनी कोणी नाराज झाले तरी चालेल; पण वस्तुस्थिती मांडावीच लागेल, असे सांगून या विषयाला तोंड फोडले आहे.