शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईमुळे जिल्ह्यात कूपनलिका खुदाईचा धडाका

By admin | Updated: May 17, 2016 01:20 IST

जिल्हा प्रशासन : धरणात पिण्यासाठी पाणी राखीव; उद्योगांची २० टक्केच पाणी कपात

कोल्हापूर : जिल्ह्णातील पाणीटंचाई निवारण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणेकडून कूपनलिका खुदाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या ३६ पैकी २९ कूपनलिकांची खुदाई केली आहे. त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कूपनलिका खुदाईलाच प्राधान्य दिले जात आहे. सर्वच धरणात पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादापाटील यांनी गेल्या महिन्यात येथील उद्योगांची २५ टक्के पाणी कपात केल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात २० टक्केच पाणी कपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे पूर्णक्षमतेने लघुपाटबंधारे प्रकल्प व धरण भरली नाहीत. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही पाणी टंचाई जाणवत आहे. पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातील एकूण पाणीसाठ्यात पिण्यासाठी राखीव साठा ठेवला आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या गावात धरणाचे पाणी योजनाद्वारे पुरवठा होत नाही. तशा गावात टंचाई निर्माण झाल्यास प्रशासन कूपनलिका खुदाई करीत आहे. असलेल्या पाण्याचे स्रोत आटल्याचे ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालयास माहिती आल्यानंतर त्वरित कूपनलिका खुदाई मंजुरी दिली जात आहे. प्रत्यक्षात कूपनलिका खुदाईचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा यंत्रणेकडून केले जात आहे. कूपनलिकेस पाणी लागल्यास त्या भागातील रहिवाशांची तहान भागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपातळी खालावल्याने कूपनलिकेचा प्रयोग फसत आहे. कूपनलिकांशिवाय अन्य उपाययोजना लालफितीतच अडकल्या आहेत. आराखड्यातील ५७ कामे मंजूर झाले आहेत. मात्र, कूपनलिका सोडून अन्य एकही काम पूर्ण झालेले नाही. पाटंबधारे विभागाने उपसाबंदी करून शेतीवरील पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. परिणामी, उसासह उन्हाळी पिके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ शेतीलाच पाणी उपसा बंदी का, असा सवाल उपस्थित करीत पाटबंधारे प्रशासनास धारेवर धरत आहेत. गेल्या महिन्यात टंचाई आढावा बैठकीत उद्योगासाठीचे २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य उद्योग प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर उद्योजकांचे २० टक्केच पाणी कपात केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीस दूधगंगा नदीतून, तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीस पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. सर्व उद्योजकांना रोज सरासरी २५ ते २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दुष्काळामुळे २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे रोज पाच दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.