शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठ माती उत्खननामुळे धोक्यात

By admin | Updated: May 3, 2017 00:26 IST

प्रशासनाकडून कारवाई नावापुरतीच : रात्रीचा दिवस करून मळीच्या मातीची लूट सुरूच

संतोष बामणे --- उदगाव ---कृष्णाकाठावरील मळीची माती सुपीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीटभट्टी कामासाठी वापरली जात आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील असलेल्या गावांना पुराचा धोका व मळीघाट नामशेष होत आहे. हीच परिस्थिती उदगाव, चिंचवाड भागात आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे नियमबाह्य मातीचे उत्खनन सुरू आहे़ नदीकाठी मातीचे उत्खनन रात्रंदिवस सुरू असल्यामुळे नदीचे संवर्धन टिकविण्यासाठी उपाययोजना न करता राजरोसपणे उदगाव, चिंचवाड, कोथळी परिसरात नियमबाह्य माती उत्खनन सुरू आहे़ परवान्यापेक्षा अधिक बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात आहे़ कृष्णा नदीकाठावरील लाल माती उपसा करून सांगली जिल्ह्यातील अंकली, हरिपूर, इनामधामणी, बामणी, टाकळी, मिरज, बोलवाड या ठिकाणी साठवणूकही केली जाते, तर उदगाव-चिंचवाड परिसरात अनेक जणांनी माती उत्खनन करून साठाही केला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवून होत असलेल्या नियमबाह्य माती उपशाला महसूल विभागाने वेळीच आवर घालणे गरजेचे होते. सध्याच्या स्थितीत अगदी नदीपात्रालगत माती उत्खनन केल्याने नदीच्या काठावरील संवर्धन धोक्यात आले आहे. एकीकडे राज्य शासन पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धनासाठी विविध योजना राबवीत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या माती उत्खननामुळे कृष्णाकाठ काळाआड जाण्याची शक्यता आहे़चिंचवाड-उदगाव परिसरात माती उत्खनामुळे मळीच्या शेतीचा व्यास होत चालला आहे़ त्यामुळे नदीचे पात्र मोठे झाले असून, अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी थेट गावात येणार आहे. आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना कृष्णाकाठ शोधावा लागणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने एक पाऊल पुढे येऊन माती उत्खननाची नियमावली देणे गरजेचे आहे. काय आहे जबाबदारीमाती उत्खनन करीत असताना नदीपात्राच्या परिसरातील वनस्पती व प्राणी यांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. उत्खननाला ठेका दिलेल्या एकूण क्षेत्राच्या समप्रमाणात इतक्या क्षेत्रावर नदीकाठी अथवा अन्य ठिकाणी वृक्षलागवड करून त्यांची माहिती ग्रामपंचायतीला देण्याची आहे. तसेच वृक्षलागवड करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा आहे. सार्वजनिक पाणवठा, पाणीपुरवठा व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अथवा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा करताना निश्चित करेल तेवढ्या अंतरापलीकडे उत्खनन करायचे आहे.प्रशासनाचे दुर्लक्षशासनाचा महसूल भरतो, मग माती उपसणारच, अशी भूमिका घेत हजारो ब्रास मातीचे उत्खनन उदगाव, चिंचवाड परिसरात सुरू आहे़ यातूनच वीटभट्टीमालकांना मोठा फायदा होताना दिसत आहे़ दरम्यान, प्रशासनाने पाहणी करून मातीचे उत्खनन किती केले आहे यावर जुजबी कारवाई केल्याचे दिसून येते.