शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या भीतीने ग्रामपंचायत दप्तर गायब

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

आमजाई व्हरवडेतील घटना : ग्रामसेवकाचे कृत्य

सुनील चौगले ल्ल आमजाई व्हरवडेआमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच तत्कालीन ग्रामसेवक दीपक भोई व सदस्य मधुकर वरूटे यांनी ग्रामपंचायतीमधील कागदपत्रेच पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ग्रामस्थांना हा प्रकार कळताच त्यांनी दप्तर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीसपाटील अशोक पाटील यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली आहे.सविस्तर माहिती अशी, गेल्या अडीच वर्षांपूर्वी सत्ता ताब्यात घेतलेल्या वरुटे दाम्पत्याच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. याबाबत कोणताही विकास नाही, पिण्यास पाणी नाही, असा आरोप करून आमजाई व्हरवडे येथील ग्रामस्थांनी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत तीन लाखांचा हिशेब मागत सरपंचांना धारेवर धरले होते. यातूनच सरपंचांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून उपसरपंचासह पाच सदस्यांनी पदाचे राजीनामे ग्रामसभेतच दिले होते, तर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बी. डी. नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे १ एप्रिल २०१४ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नाईक यांनी विस्तार अधिकारी एस. पी. खोचरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. चौकशीचा आदेश प्राप्त झाल्याने कालच खोचरे ग्रा. पं. कार्यालयात आले. मात्र, सरपंच किंवा ग्रामसेवक यापैकी कोणीही हजर राहिले नसल्याने चौकशी अधिकारी दिवसभर थांबून परत गेले. चौकशी अधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच सरपंच मंदा वरुटे यांचे पती व विद्यमान सदस्य मधुकर वरुटे व तत्कालीन ग्रामसेवक दीपक भोई यांनी शिपाई साताप्पा पाटील यांच्यावर दबाव आणून सर्व रेकॉर्डच गायब केले. हे रेकॉर्ड शिरगाव येथे भोई यांच्या बहिणीच्या घरी लपवून ठेवले होते. याच दरम्यान साताप्पा पाटील याला भोई यांनी कोंडून घातले व हा प्रकार कोणाला सांगितला तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली. पाटील यांनी दोन तासांनी आपली सुटका करून घेऊन गाव गाठले व सर्व प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी पोलीसपाटील अशोक पाटील यांना घेऊन शिरगाव येथील दप्तर पंचनामा करून ताब्यात घेतले व अशोक पाटील यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणात नेमके काय गौडबंगाल आहे, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.