शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पावसाने उत्पादन घटणार

By admin | Updated: September 8, 2015 23:39 IST

आजरा पंचायत समिती सभा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आजरा : यावर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला असल्याने शेती उत्पादन केवळ ३५ ते ४० टक्केच मिळणार आहे. अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.सभापती विष्णूपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांनी स्वागत केले. अपुऱ्या पावसाच्या कारणास्तव यंदा पिकस्थिती समाधानकारक नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी मांडला. आजरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढत असून यामुळे स्थानिक पातळीवर सुसज्ज यंत्रणेच्या अभावामुळे अनेक रूग्ण दगावण्याच्य घटना घडत असल्याचे विलास जोशिलकर यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सभापती केसरकर यांनी केल्या.आजरा-गडहिंग्लज मार्गावर उत्तूर फाट्याजवळ असणारे पिकअप शेड चारचाकी वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्या पिक-अप-शेडची एस.टी. महामंडळाने दुसरीकडे व्यवस्था करावी, असे सभापती केसरकर यांनी सांगितले.गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा आगारातर्फे मुंबई येथे सोडण्यात येणाऱ्या जादा बसफेऱ्यांची माहिती आगार व्यवस्थापक के. डी. मुरूकटे यांनी दिली. शिष्यवृत्तीसह विविध परीक्षांमध्ये तालुक्याने यश मिळविल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी बी. एम. कासार व शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेमध्ये विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे, कामिनी पाटील, उपसभापती दीपक देसाई, अनिता नाईक, निर्मला व्हनबट्टे, तुळशीराम कांबळे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)बरगे टाकून पाणी अडविणारपावसाने पाठ फिरवल्याने आजरा तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये बरगे टाकून पाणी अडविण्यास सुरूवात करणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता हारदे यांनी सांगितले.