शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उच्चांकी दरामुळे गुऱ्हाळमालक सुखावल

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

हंगाम अंतिम टप्प्यात : सरासरी दरात घट; काही कलमांना चांगला दरे

सहदेव खोत - पुनवत -शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरात उत्पादित गुळाची कलमे दरात आता उभारी घ्यायला लागली असून, गुळाचा सरासरी दर जरी कमी असला तरी, काही कलमांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी आता गुऱ्हाळ उद्योग फायद्याचा ठरू लागला आहे. बुधवारी शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी येथील बळी सखाराम पाटील यांच्या गुळाला हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिक्विंटल ६५०० रुपये दर मिळाला. या गुळाचा सौदा कऱ्हाड येथील उत्तमराव जाधव (भाटवडेकर) यांच्याकडे पार पडला, तर अन्य काही कलमांना ५००० ते ६०१० पर्यंत दर मिळाला.शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गुऱ्हाळ हंगाम आता अंतिम टप्प्याकडे चालला आहे. शेतकरी मोठे व छोटे रवे याच्या रूपात बाजारपेठेत गूळ पाठवत आहेत. या हंगामात गुळाला सरासरी चांगला दर मिळालेला नाही, हे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे आहे. मात्र गुळाला कमी-अधिक दर का मिळतो, याबाबत शेतकऱ्यांना फारसे आही माहीत नसते. होईल तसा गूळ तयार करून तो बाजारपेठेत पाठविणे एवढेच त्यांना माहीत असते.यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या गुळाला सरासरी ३००० ते २५०० च्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दुसरीकडे गेल्या महिन्याभरात अनेक शेतकऱ्यांच्या गुळाला काही कलमांना चार हजार ते सहा हजारांवर दर प्राप्त झाला आहे.नुकत्याच कऱ्हाड बाजारपेठेत भाटवडेकर यांच्याकडे झालेल्या गूळ सौद्यात मालेवाडीच्या बळी पाटील यांच्या गुळाला पाच कलमांना ५००० ते ६५०० इतका प्रतिक्विंटल दर मिळाला, तर कोतोलीच्या भीमराव शिंदे यांच्या गुळाला ४१४० इतका दर प्राप्त झाला. त्यांना या गळितापासून नफा झाल्याचे दिसून येत आहे.असा ठरतो दर...गुळाचा दर रंग, चव व कणी यावर ठरत असतो. एकाच शेतातील उसापासून बनविलेल्या गुळाचा रंग, चव, कणीमध्ये वापरलेली रसायने, उसाची जात, आदण शिजविण्याची पध्दत व गुळव्याचे कसब यामुळे फरक पडतो. कठीणपणा, चांगली चव व चांगला रंग असलेल्या गुळालाच चांगला दर मिळतो. गूळरव्यांच्या वेगवेगळ्या कलमांना वेगवेगळा दर मिळतो.