शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महापुराच्या जोरदार तडाख्याने गूळ हंगाम आला अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:22 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुºहाळघरेही ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुºहाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुºहाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच गुºहाळमालकांसमोर आहे. त्यामुळे या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविलाजात आहे.कोल्हापूरच्या गुळाची देशात ख्याती आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी येथे गुळाची बाजारपेठ वसविली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिले. यंदा अतिवृष्टी व महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसला असून, त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टरांवरील ऊसपीक पुराच्या पाण्याखाली सापडले असून, यापैकी २२ हजार हेक्टर ऊस गुºहाळघराकडे येतो. त्यामुळे आगामी हंगामात किमान सात लाख गूळ रव्यांचे (३० किलो) उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर गुºहाळघरांचीही पडझड झाली असून, जळणाच्या गंज्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हंगाम कसा सुरू करायचा, असा पेच आहे.उत्पादनाबरोबर प्रतीला फटकागुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या उसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.चिखली परिसरातील चिमण्या थंडावणारप्रयाग चिखली, वडणगे, वरणगे, निगवे दुमाला, पाडळी बुद्रुक परिसरांत सर्वाधिक गुºहाळघरे आहेत; पण महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा या भागातील गुºहाळघरांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसर बनली आहे.