शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या भीतीने ‘त्या’ पोलिसांचे धाबे दणाणले

By admin | Updated: November 4, 2014 01:03 IST

विठ्ठलाला साकडे : राजकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याच्या हालचाली फोल

कोल्हापूर : गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाणप्रकरणी कारवाईच्या भीतीने ‘त्या’ तिघा पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. राजकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याच्या हालचाली फोल ठरल्याची चर्चा दबक्या आवाजात आज, सोमवारी दिवसभर पोलीस दलात सुरू होती. बचाव करण्यासाठी तिघांपैकी एका कॉन्स्टेबलने थेट विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर गाठल्याची चर्चा आहे. थोडगे मारहाण प्रकरणात पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये ते तिघे पोलीस दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल पाच महिन्यांनी हे प्रकरण पुन्हा पुढे आल्याने संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईच्या भीतीने आज दिवसभर त्या पोलिसांनी आपले मोबाईल उचलण्याचे धाडस केले नाही, तर एकाने थेट विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूर गाठल्याची चर्चा आहे. सुमित पाटीलसह आणखी दोघांचा समावेश असलेल्या कॉन्स्टेबलमध्ये एकजण गगनबावडा पोलीस ठाण्याकडून, तर दुसरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करवीरमध्ये रुजू झाला असल्याचे समजते. थोडगे मारहाण प्रकरणाची यापूर्वी पत्रकारांनी विचारणा केली असता तपास पूर्ण होऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी सांगितले होते. त्यानुसार डॉ. शर्मा यांच्याकडे चौकशी केली असता अहवाल माझ्याकडे आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलण्यातील तफावतीमुळे अहवालाबाबत चालढकल होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शर्मा यांनी आपल्याकडे अहवाल दोन दिवसांत सादर होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असा विश्वास पत्रकारांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्णाचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)