शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात

By admin | Updated: January 6, 2017 00:26 IST

सक्तीचा शिक्षण अधिकार कायदा : पालिकांकडील शिक्षण मंडळांवर आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांचे नियंत्रण

इचलकरंजी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा सन २००१ पासून अस्तित्वात आल्यामुळे महापालिका व नगरपालिका यांच्याकडील शिक्षण मंडळ सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. महापालिकांकडील आयुक्त व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची शिक्षण मंडळाकडे सक्षम व नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्ट आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत.जिल्ह्याकडे असलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळेवर संबंधित जिल्हा परिषदेकडील शिक्षण समितीचे नियंत्रण होते. त्यापैकी काही गावांचे नगरपालिका व महापालिकांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या गावातील प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा संबंधित पालिकांकडे नगरसेवकांकडून निवडून आलेल्या शिक्षण मंडळाकडे नियंत्रणासाठी देण्यात आल्या होत्या. अशा शिक्षण मंडळावर शासनाकडून प्रशासन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षण मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण खात्याकडील अधिनियमानुसार हे प्रशासन अधिकारी करीत असत.सन २००९ मध्ये केंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आणला. त्यामुळे सन २००० पूर्वीचे प्राथमिक शिक्षणाशी निगडित सर्व कायदे व अधिनियम रद्द झाले. या कायद्यानुसार मुंबई प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, हैदराबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्य प्रदेश प्राथमिक शिक्षण अधिनियम बरखास्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिका व नगरपालिकांमधील शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. सरकारच्या या निर्णयाविरोधात पिंपरी-चिंचवड पालिकेतील तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सध्याच्या शिक्षण मंडळांच्या सदस्यांचा कालावधी असेपर्यंत शिक्षण मंडळाकडील सदस्यांचे अस्तित्व अबाधित ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले.उच्च न्यायालयाच्या या आदेशाला अधिन राहून १ जुलै २०१३ रोजी शासनाने महापालिका व नगरपालिकांकडील अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळांच्या जुन्या सभागृहांची मुदत संपल्यानंतर त्यांचे अस्तित्व बरखास्त केले. आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून, जुन्या सभागृहाने निवडलेल्या सर्व शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. परिणामी महापालिकांकडील आयुक्त व नगरपालिकांकडील मुख्याधिकारी हे शिक्षण मंडळावर सक्षम अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांचे आदेश व सूचना शिक्षण मंडळांकडे कार्यरत असणारे प्रशासन अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बंधनकारक राहतील, अशा आशयाचे निर्देश शासनाच्या शिक्षण खात्याने सर्व शिक्षण मंडळांना दिले आहेत. शासनाच्या या आदेशाप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांतील नवनिर्वाचित नगरपालिकांकडील शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल व गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील विटा व तासगाव, सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, पाचगणी व महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी प्राथमिक शिक्षण मंडळाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मंडळाच्या नियंत्रणाबाबत संभ्रमनगरपालिकेकडे अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण समिती व समितीचे सभापती यांना प्राथमिक शिक्षण मंडळाकडे कामकाज करण्यासाठी अधिकार असणार की नाही? यासंदर्भात शासनाचे कोणत्याही प्रकारचे निर्देश नाहीत. त्यामुळे नगरपालिका शिक्षण समिती व सभापती यांच्याकडून शिक्षण मंडळाविषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत बैठका होणार की नाही ? याबाबत संभ्रमावस्था आहे.