शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

निवडणूक वादातून गिरगावात धुमश्चक्री

By admin | Updated: October 12, 2014 01:06 IST

सहा जखमी : सतेज-महाडिक समर्थक भिडले

कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थकांमध्ये आज, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास किरकोळ वादातून धुमश्चक्री झाली. त्यामध्ये दोन्ही गटांचे मिळून सहाजण किरकोळ जखमी झाले. त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही उमेदवारांचे समर्थक रात्री उशिरा आवारात जमल्यावर वातावरण तणावपूर्ण बनले. गिरगावातही तणावपूर्ण शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.या मारहाणीत यशवंत नामदेव पाटील (वय २८ ), पांडुरंग शामराव चव्हाण (४८, दोघे रा. गिरगाव परिसर), निवृत्ती ज्ञानू पाटील (३५), किरण निवृत्ती पाटील (२२), मच्छिंद्र हिंदुराव कुरणे (२२), विष्णू बापू पाटील (५५, रा. गिरगाव) असे दोन्ही गटांचे मिळून सहाजण जखमी झाले. या जखमींना ‘सीपीआर’मध्ये आणल्यावर सतेज पाटील गटाच्या वतीने माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, जिल्हा परिषद सदस्या मनीषा वास्कर, नगरसेवक विजय सूर्यवंशी, तर महाडिक गटाच्या वतीने नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, रमेश पुरेकर, महेश वासुदेव, आदी जमले होते.यासंबंधी घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (पान १ वरून) यांच्या प्रचारासाठी गिरगावातील मुख्य चौकात निपाणीच्या भाजपच्या आमदार शशिकला ज्वोल्ले यांना घेऊन माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी गेले होते. सभा सुरू होण्यास काही कालावधी असताना त्याच परिसरातून गावातील काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचारफेरी काढली. ती सभेच्या ठिकाणी आल्यावर अज्ञातांनी मारलेला दगड फेरीतील कार्यकर्ते पांडुरंग चव्हाण यांना लागला. आपल्या कार्यकर्त्याला दगड लागल्याचे समजताच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून सभेच्या ठिकाणी असलेले महाडिक समर्थक व पाटील समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये फायबरच्या शंभराहून अधिक खुर्च्यांची मोडतोड, सभामंडपाची तोडफोड व दूरचित्रवाणीचेही नुकसान झाले.सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी घाबरून भीतीने पटापट दारे लावून घेतली. मारामारी सुरू झाल्याचे पाहून कोणीतरी आमदार ज्वोल्ले यांना व्यासपीठाच्या मागील बाजूस असलेल्या एका घरात सुरक्षितस्थळी बसविले व लगेच त्यांना गाडीतून कोल्हापूरला पाठविण्यात आले. हा प्रकार समजताच पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेवेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची निगवे खालसा (ता. करवीर) येथे सभा होती, तर भाजपचे उमेदवार अमल महाडिकही गिरगावातील सभेला उपस्थित नव्हते.