शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सवलतींमुळे दिवसभरात वाहन विक्रीचा टक्का वाढला

By admin | Updated: March 30, 2017 18:56 IST

बीएस-३ वाहन विक्रीचा उद्या शेवटचा दिवस ; १ एप्रिलपासून भारत स्टेज -४ गाडयांचीच विक्री

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : भारत स्टेज-४ (बीएस ४) या मानके असलेलीच वाहने विक्रेत्यांना विकता येणार आहेत. या निर्णयामुळे गुरुवारी दिवसभर भारत स्टेज-३ (बीएस-३) मानके असलेली दुचाकीसह चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यात अगदी १० हजारापासून ते ४० हजारांपर्यंत किंमतीत सवलत देण्यात आली. सवोच्च न्यायालयाने भारत स्टेज-३ (बीएस ३) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर कार्बन उत्सर्जनामुूळे नागरीकांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करुन बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारपासून देशभरात बीएस-४ मानके असलेलीच वाहने कंपन्यांना विक्री करता येणार आहेत. आतापर्यंत उत्पादीत केलेली दुचाकीसह चारचाकी वाहने ही बीएस-३ मानके असलेली होती. त्यांचा स्टॉक तसाच राहणार म्हणून कंपन्यांनी नामी शक्कल लढवत अगदी १० हजारापासून ४० हजारांपर्यंत किंमतीत सुट दिली. याशिवाय वर्षभराचा विमाही मोफत देऊ केला. त्यामुळे एका दिवसात काही विक्रेत्यांकडील शिल्लक दुचाकी हातोहात खपल्या. देशभरासह त्याचा परिणाम कोल्हापूरातही झाला. या बीएस-३ मानके असलेली वाहने विक्रीस बंदीच्या निर्णयामुळे बुधवारी सायंकाळपासून किंमती कमी झाल्याचे संदेश सोशल मिडीयावरुन सर्वत्र फिरु लागले. गुरुवारी तर अनेकांनी किंमती कमी झाल्याचा फायदा घेत वाहन खरेदी केली. यात ३१ मार्च २०१७ पर्यंत विक्री व खरेदी झालेली वाहने प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी होणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुचाकी व चारचाकी वाहन विक्रेत्यांकडे खरेदीसाठी सणासुदीच्या मुहुर्ताप्रमाणे गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. काय आहेत बीएस मानके...भारत स्टेज (बीएस) मानकाची २००० साली कार्यवाही करण्यात आली. यात वाहनांसह इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात आला. त्यातून मानके केंद्र सरकारने जाहीर केली. पर्यावरण, वने आणि वातावरणातील बदल मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मानके आणि त्याची कार्यवाही यांचे वेळापत्रक निश्चित केले. युरो नियमकानूसार भारत स्टेज (बीएस) निश्चित केले जातात. एप्रिल २०१० पासून १३ मोठ्या शहरात बीएस-४ ची कार्यवाही सुरु केली. आता ही देशभरात सर्वत्र १ एप्रिल २०१७ पासून होत आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत जी वाहने खरेदी विक्रीच्या प्रक्रीयेत आली आहेत. अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे होणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून युरो मानांकनाच्या धर्तीवर केवळ बीएस-४(भारत स्टेज-४) ही मानके असलेल्या वाहनांचीच नोंदणी कार्यालयाकडे केली जाणार आहे. याची दखल सर्व नागरीकांना घ्यावीडॉ. डी.टी.पवारप्रादेशिक परिवहन अधिकारी