शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासह कोल्हापूरसाठी आता सर्वच जिल्ह्यात गुरुवारी ड्रायरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी ७ जानेवारी (गुरुवार) ...

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी ७ जानेवारी (गुरुवार) हा दिवस निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत राज्यात सर्व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची बुधवारी दुपारी ४ वाजता व्हीसीव्दारे बैठक होणार असून, यामध्ये हा तपशील ठरवला जाईल.

कोरोना प्रतिबंधक लस देण्याची पूर्वतयारी नेमकी कशी झाली आहे, याची चाचणी घेण्यासाठी ड्राय रनचे आयोजन करण्यात येते. २ जानेवारी रोजी राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र केवळ चार शहरांमधील नियोजनावर अवलंबून न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये नेमकी काय तयारी झाली आहे, याची खातरजमा करण्यासाठी सर्वत्र ड्राय रन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचा संपूर्ण तपशील बुधवारी व्हीसीव्दारे होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. ड्राय रन केवळ जिल्हा पातळीवर घ्यायची आहे की तालुका पातळीवर याचा निर्णय अजून झाला नसल्याचे सांगण्यात आले. परंतु याची तयारी आरोग्य विभागाने केली असून, वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांनुसार याचे नियोजन करण्यात येणार आहे.

चौकट

ड्राय रन म्हणजे काय

प्रत्यक्ष लस न देता केवळ ही प्रक्रिया कशी असेल, याचे प्रात्यक्षिक घेतले जाईल.

ठराविकजणांना ठरलेल्या वेळेत बोलावण्यात येईल.

आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटवली जाईल.

ओळख पटल्यानंतर डमी पाेर्टलवर त्यांची नोंद केली जाईल.

लस देण्याच्या कक्षामध्ये त्यांना पाठवले जाईल.

लस देण्यात आल्याची नोंद केली जाईल.

पुढील ३० मिनिटे त्यांना निरीक्षणाखाली आरोग्य कक्षात बसवले जाईल.

चौकट

ड्राय रनचा फायदा काय

प्रत्यक्षात लसीकरणावेळी काय अडचणी उद्भवू शकतात, हे या ड्राय रनमुळे कळणार आहे. लसीकरणावेळी धावपळ होऊ नये यासाठीची ही रंगीत तालीम असून, केवळ नोंदवलेल्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी ड्राय रन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.