शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांकडून नियम धाब्यावर

By admin | Updated: July 18, 2014 00:21 IST

कोतोली परिसर : गाडी चालविताना मोबाईलवरबोलतात बिनधास्त

किरण मस्कर- कोतोलीकितीही नियम शासनाने लावायचे, पण आपणाला जो नियम लावायचा आहे, तोच नियम लावणाऱ्या एस.टी. वाहकांनी एस.टी.चे नियमच धाब्यावर बसविले आहेत.कोतोली परिसरात वाहक व प्रवासी यांच्यात किरकोळ सुट्टे पैसे देण्यावरून वाद नेहमीच पाहावयास मिळतो. हा वाद काही येथील प्रवाशांना नवीन नाही; पण अशाच वादांमधून सुट्टे पैसे असतानाही प्रवाशांना पैसे न दिल्याने वाहकाला प्रवाशांचा मार खावा लागला. त्यातच गाडी चालविताना चालक व वाहकांनी मोबाईल बंद ठेवून आपली ड्यूटी करायची आहे, असा नियम अथवा आदेश असतानाही चालक गाडी चालविताना, तर वाहक प्रवाशांना तिकीट देताना मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. अशा चालक-वाहकांना एक-दोन वेळा समज देणे हा पहिला एस.टी.चा नियम आहे. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार दाखल केली जाते किंवा समज देऊनही न ऐकणाऱ्या चालक-वाहकांना निलंबित केले जाते, असा नियम एस.टी.चा आहे; पण अद्याप एकाही चालक-वाहकांवर कारवाई झालेली नाही. परिसरात एस.टी. चेकरची गाडी अनेकवेळा पाहावयास मिळते; पण कोल्हापूरमधून चेकरची गाडी कोतोलीकडे येणार आहे, ही माहिती वाहकांना अगोदरच समजते. यामध्ये कोतोली, नांदगावसारख्या बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणच्या पानटपरी चालक, हॉटेल, किराणा दुकानदाराला फोन लावून ही माहिती उपलब्ध केली जाते. यामध्ये चेकरची निळी गाडी व त्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिले असल्याने चेकरची गाडी ओळखता येते. यामुळे वाहकाला अगोदर नेहमी चहा पिणाऱ्या हॉटेल किंवा नेहमी पान खाणाऱ्या तसेच वारंवार एखाद्या किराणा दुकानात बाजार खरेदी करणाऱ्या दुकानदारांकडून फोनवरून चालक अथवा वाहकाला माहिती दिली जाते. यामुळे पुढे चेकर आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन वाहक आपली गाडी ‘ओके’ करून घेऊन येतात. या चेकरना चालक-वाहक मोबाईलवर बोलताना दिसतात; पण कारवाई काहीचहोत नाही.