शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सातेरी-महादेव परिसरात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: May 5, 2016 00:50 IST

पाण्याची पातळी कमी : सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद

शिवराज लोंढे -- सावरवाडी तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अन् वाढता हवेतील उष्मा, अंगाची लाही लाही होणारे वातावरण यामुळे तहानलेल्या जिवाची तहान भागविणे कठीण बनले आहे. सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडू लागल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने सार्वजनिक नळपाणी योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. जनतेच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याने सातेरी-महादेव (ता. करवीर) या डोंगरी भागातील वाड्यावस्त्यामधील गावांना ऐन उन्हाळ््यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सन १९७२ नंतर यावर्षी भयानक स्वरूपाचा दुष्काळ जाणवत आहे. शेती व्यवसायाला पाणी मिळत नाही. तसेच पिण्याचा पाणीप्रश्नही भेडसावत आहे. अपुऱ्या पावसामुळे सातेरी-महादेव डोंगरी भागात भूगर्भातील पाण्याची पातळी घट्ट झाली. त्यामुळे सार्वजनिक विहिरीतील पाण्याने तळ गाठला गेला. परिणामी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडू लागल्या आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून सातेरी-महादेव डोंगरी भागातील धोंडेवाडी, नरगेवाडी, केकतवाडी, बेरकळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा पडल्याने पिण्याचा पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. घरटी चार घागरी पाणी वाटपामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मात्र डोंगरी लोकांचे हाल होत आहेत. सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या नळांना बोटाएवढी पाण्याची धार येते. त्यामध्ये गल्लीवार पाण्याच्या पाळ््या बनवून रात्रंदिवस घागरीने पाण्याचे वाटप सध्या सुरू आहे. घरटी चार घागऱ्या पाण्यामुळे कुटुंबाचा प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला आहे. बैलगाडीतून नदीकाठच्या गावातून ग्रामस्थ पाणी नेत आहेत.सातेरी-महादेव डोंगरी भागातील गावांचा कायमस्वरूपी पिण्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी भोगावती नदीतून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. डोंगरातील झऱ्यातून पाणी कमी येते. दरवर्षी मार्च महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न डोंगरी भागातील लोकांना थंडावत असतो. शिवाय पाणी टंचाईग्रस्त गावांतील कूपनलिका खुदाईची कामेही शासकीय पातळीवर रेंगाळलेली आहेत. दिवसाला चार घागरी पाणी डोंगरी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला गेला. सार्वजनिक नळ योजनेद्वारे बोटभर पाणी येत असते. घरोघरी पाण्याच्या चार घागरी वाटप केल्याने लोकांची तहानही भागू शकत नाही. पाण्यासाठी रात्रंदिवस जागावे लागते.