शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

‘ठिबक’च्या अनुदानाचे गळते कायम!

By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST

तीन वर्षे अनुदानच नाही : शेतकरी मेटाकुटीला; कंपन्यांकडून विलंब झाल्याने अनुदान रखडले

राजाराम लोंढे -कोल्हापूर=mजिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी ठिबकच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. गेली तीन वर्षे अनुदान न मिळाल्याने ठिबकसाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा फुगू लागला आहे. कृषी कार्यालयात हेलपाटे मारून शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याने या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शेतीसाठी पाण्याचा वारेमाप वापर सुरू असल्याने शेतीचा पोत ढासळत आहे. त्याचबरोबर पावसाच्या अनिश्चिततेमुळे कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यासाठी आगामी काळात पाणी मोजूनच वापरावे लागणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करताना पीकांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकार ठिबक सिंचनासाठी आग्रही आहे. एकूण अनुदानाच्या ८० टक्के पैसे केंद्र, तर २० टक्के राज्य सरकार देते. उशिरा का असेना पण शेतकऱ्यांना ठिबकचे महत्त्व कळू लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाणी असताना येथील शेतकरी ठिबककडे वळला आहे. जिल्ह्णात सुमारे तीन हजार हेक्टरवर ठिबकचे क्षेत्र आहे. ठिबकला चालना देण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले, पण गेली तीन वर्षे अनुदानच मिळालेले नाही. २०१२-१३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एक हजार प्रस्ताव आलेले आहेत. या एकाही शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत. तीच अवस्था २०१३-१४ वर्षातील शेतकऱ्यांची आहे. चालू वर्षात अनुदानासाठी १ कोटी ९६ लाख केंद्राकडून, तर ४८ लाख ४० हजार राज्य सरकारकडून उद्दिष्ट आहे. पण यापैकी केवळ ४९ लाख १७ हजारांचे वाटप झालेले आहे.अनुदानातही कपात!दोन वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्र पाच एकरांच्या आत आहे, त्यांना ६० टक्के, तर त्यापेक्षा जास्त असणाऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जात होते. आता त्यामध्ये कपात करून अनुक्रमे ४५ व ३५ टक्के अनुदान केले आहे, तेही वेळेत मिळत नाही. एकरी ५० हजार खर्च पिकाच्या सरीमधील अंतर व पाणी उपसा कशातून करणार यावरच ठिबकचा खर्च अवलंबून असतो. विहीर किंवा बोअरच्या पाण्यावर ठिबक करायचे म्हटले तर एकरी ५० हजार खर्च अपेक्षित असतो. नदीच्या पाण्यासाठी फिल्टरचा खर्च वाढत असल्याने तो ६० हजारापर्यंत जातो. सरकारची नुसतीच सक्तीराज्यात नवीन आलेल्या युती सरकारने पाणी वाचवण्यासाठी ठिबकची सक्ती केलेली आहे. ठिबक असल्याशिवाय उसाचे पीक घेता येणार नाही, असा विचार शासन पातळीवर सुरू आहे, पण अनुदान दोन-तीन वर्षे देणार नसाल, तर ठिबकच्या पाईपा गळ्यात अडकायच्या का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. २०१४-१५ मध्ये तालुकानिहाय दाखल झालेले प्रस्ताव असे-तालुकापरिपूर्ण अनुदानप्रस्ताव वाटप प्रस्तावआजरा३२००भुदरगड१४००चंदगड१४ ००गडहिंग्लज७५००गगनबावडा०१००हातकणंगले ४२१८२कागल१४७ २१करवीर१५८ ००पन्हाळा ४० ००राधानगरी३० ००शाहूवाडी ००००शिरोळ ५२२१७७एकूण१४५४२८० २०१२-१३ चे अनुदानाचे पैसे न आल्याने हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही प्रस्ताव ठिबक कंपनीकडून विलंब झाल्याने अनुदान मिळालेले नाही. कंपन्यांनी वेळेत प्रस्ताव दिले नाही तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. आता आॅनलाईन प्रस्तावांची तपासणी सुरू असून, येत्या मार्चपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. -मोहन आटोळे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी) दोन वर्षे झाली २५ गुंठ्यांत ठिबकचा प्रस्ताव कृषी खात्यात पडून आहे. अद्याप अनुदान मिळालेले नाही. कृषी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळा आलेला आहे, पण दाद मागायची कोणाकडे?- रामचंद्र बापू खाडे (शेतकरी)