शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तातील घर स्वप्नातच?

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

प्रधानमंत्री आवास योजना : अर्जविक्री २० हजार, दाखल अवघे १ हजार; कागदपत्रांअभावी अर्जदारांची धावपळ

कोल्हापूर : ‘वीस हजार अर्जांची विक्री अन् अवघे एक हजार अर्ज दाखल’ अशी प्रधानमंत्री आवास योजनेची अवस्था झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना इच्छुक लाभार्थ्यांची पुरती धावपळ होत आहे. स्वस्तातील घर मिळण्याच्या तीव्र इच्छेखातर इच्छुक लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी शिवाजी मार्केटमधील कार्यालयात दररोज झुंबड उडालेली दिसत आहे; पण पुरेशा कागदपत्रांअभावी ते पुन्हा मागे फिरत आहेत. त्यामुळे स्वस्तातील घर स्वप्नातच राहण्याची चिन्हे आहेत. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी लाभार्थी निवडीसाठी मागणी सर्वेक्षण सुरू आहे. या मागणी सर्वेक्षणाच्या विहित नमुन्यांतील अर्जाची विक्री महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत ५० रुपये नाममात्र शुल्क आकारून करण्यात आली. दरम्यान, काही खोडसाळ व्यक्तींनी या इच्छुक लाभार्थी अर्जदारांना ‘तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करून देतो व अर्ज सादर करून देतो’ असे सांगून अनेक अर्जदारांकडून विविध रकमा घेतल्याच्या तक्रारी अनेकांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे केल्या. दरम्यान, सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २३ मे ही अंतिम मुदत असल्याने शिवाजी मार्केटमधील योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. या कार्यालयात अर्जदाराने प्रवेश केल्यानंतर त्याच्याकडील कागदपत्रांची पहिल्या टप्प्यात एकूण पाच कर्मचारी तपासणी करतात. त्यानंतर सामाजिक विकास विशेषतज्ज्ञ प्रसाद संकपाळ आणि क्षमता बांधणी विशेषज्ञ संतोष धुमाळ यांची मोहोर उमटविली जाते. त्यानंतरच परिपूर्ण कागदपत्रांचा अर्ज स्वीकारला जातो. अपुरी कागदपत्रे असणारा अर्ज पुन्हा अर्जदाराकडे देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे पुरेशा कागदपत्रांअभावी अर्जदाराला फेऱ्या माराव्या लागत आहेत.अर्जदारांना वेगवेगळ्या नऊ प्रकारचे परवाने दाखल करण्याची सक्ती असतानाही या अर्जदारांना तहसीलदार कार्यालयातून उत्पन्नाचे दाखले व अधिवास प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. तसेच हे दाखले मिळवून देण्यासाठी एजंटांची साखळी तयार झाल्याचे लक्षात आले; त्यामुळे महापालिकेच्या वतीने दाखले मिळवून देण्यासाठी विभागीय कार्यालयांत कार्यशाळा घेतली. यामध्ये अवघ्या तीन-चार दिवसांत करवीर तहसीलदारांकडून दोन्हीही दाखले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात आठवडा उलटला तरीही संबंधित दोन्हीही दाखले मिळाले नाहीत.सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशप्रधानमंत्री आवास योजनेबाबत गृहनिर्माण प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी संचालक निर्मलकुमार देशमुख हेही उपस्थित होते. त्यांनी सर्व कामकाजाचा आढावा घेत विभागीय कार्यालयामार्फत क्रॉस तपासणी, प्रत्यक्ष अर्जदाराची जागेवर जाऊन पाहणी, आदी सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.राजीव गांधी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभयापूर्वी राजीव गांधी आवास योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, या योजनेतील लाभार्थ्यांनाही या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून मागील कागदपत्रेच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सामाजिक विकास विशेषज्ञ प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.