शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

स्वप्नांचा खेळ... अन् आमिषाचा बळी !

By admin | Updated: March 12, 2016 00:57 IST

की असाच कोणी मोठा व्यावसायिक त्याच्या मोठ्या स्वप्नासाठी कुठल्याही सर्वसामान्यांचा सहज बळी देऊ शकतो...? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.

गडहिंग्लज : एक व्यावसायिक... त्याचा मोठेपणाचा हव्यास... त्यासाठी त्याच्या मोठ्या उलाढाली... त्यातून त्याचं कर्जाच्या गाळात रुतन... अशी अनेक उदाहरणे समाज बघतो, पण असं गाळात रुतलेल्या एका व्यावसायिकाने त्यातून वर येण्यासाठी एका सर्वसामान्य मोलमजुराचा थंड डोक्याने ‘बळी’ देणं अन् त्याच्या कुटुंबीयांना दु:खाच्या खाईत होरपळायला लावून त्यावर स्वत:च्या कुटुंबासाठी सुखाची ऊब शोधणाऱ्या घटनेने नुकताच जिल्हा हादरला.कर्जाच्या गाळातून वर येण्यासाठी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अमोल पवारने ३५ कोटींचा विमा हडप करण्याच्या रचलेल्या खेळात कर्नाटकातून गडहिंग्लजमध्ये मोलमजुरीसाठी आलेल्या एकोणीस वर्षीय रमेश नाईक या तरुणाचा केवळ सतराशे रुपयाच्या आमिषाने बळी गेला. विजापूर जिल्ह्यातील मुदेब्याळ तालुक्यातील नागबेनाळ येथील कृष्णापा नाईक हे त्यांच्या पत्नी शांताबाई, मुलगा रमेश आणि मुलगी संगीता यांच्यासह मोलमजुरीसाठी डिसेंबरमध्ये गडहिंग्लज येथे आले. कडगाव रस्त्यावरील माळावर पत्र्याच्या शेडमध्ये राहून एका ठेकेदाराकडे रस्त्याच्या कामासाठी मोलमजुरी करू लागले. २८ फेब्रुवारीलाही ते नेहमीप्रमाणेच रस्त्याचे काम संपवून परतत असताना आपल्या खेळासाठी सावज शोधणाऱ्या अमोलची नजर रमेशवर पडली. नळ कनेक्शनसाठी खड्डा काढायचे आहे असे सांगून त्याला एक दिवसाच्या कामाचे सतराशे रुपये देण्याचे आमिष दाखविले. रोजंदारीवर राबणाऱ्या रमेशसाठी ही रक्कम खूप मोठी वाटल्याने त्यात तो भुलला. अमोलने त्याचा भाऊ विनायकसह रचलेल्या या खेळाची रमेशच्या कुटुंबीयांना साधी शंकाही येण्याची सुतराम शक्यता नव्हतीच, पण रमेशच्या सहज बळी जाण्यास आणखीन एक कारण म्हणजे त्याचे त्या दोघांसोबतचे दारू पिणे... दारूच्या नशेत असलेल्या रमेशचा गळा आवळून खून करणे दोघा भावांना सहज शक्य झाले, अन्यथा रमेशचा सक्षम प्रतिकार कदाचित त्यांचा खेळ उधळू शकला असता. दोघा भावांनी त्यांचा रचलेला ‘खेळ’ पूर्ण केला. मात्र, पोलिसांनी कसून या खेळाची पाळेमुळे खोदून दोघांच्या मुसक्या आवळल्या. आता कायद्याने त्यांना शिक्षा होईलही. मात्र, केवळ सतराशे रुपयाच्या आमिषासाठी बळी गेलेल्या रमेशचे काय? तो ज्या कुटुंबाचा आधार होता त्या कुटुंबाचे काय? त्या कुटुंबाच्या स्वप्नांचे काय? की असाच कोणी मोठा व्यावसायिक त्याच्या मोठ्या स्वप्नासाठी कुठल्याही सर्वसामान्यांचा सहज बळी देऊ शकतो...? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.