शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक होण्याचे स्वप्न अपघाताने उद्ध्वस्त; सांगलीचा तरुण मृत्युशय्येवर

By admin | Updated: February 16, 2015 23:31 IST

ही दुर्दैवी कहाणी आहे, सांगली जिल्ह्यातील कंथे गावच्या अप्पासाहेब इरमल याची! वडील शेतमजूर, हातावरचे पोट... सैनिक झाल्यानंतर अठराविश्व दारिद्र्य दूर होईल व देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल

आनंद त्रिपाठी - वाटूळ (जि. रत्नागिरी)बालवयापासूनच सैनिक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हलाखीच्या परिस्थितीमध्ये रात्रंदिवस मैदानावर कसून सराव करणारा अप्पासाहेब इरकर हा (वय २०) तरुण १२ वी पास होताच सैनिक होण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाला. शुक्रवारी (दि. १३) शिवाजी स्टेडियममध्ये तो जीव तोडून धावला. मैदानावरील सर्व चाचण्या त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. बाकी होती ती १६ फेब्रुवारीची वैद्यकीय चाचणी; पण दुर्दैवाने १५ तारखेला रात्री रत्नागिरीमध्येच त्याला अज्ञात वाहनाने ठोकरले आणि हा गरीब तरुण आज मृत्युशय्येवर आहे. ही दुर्दैवी कहाणी आहे, मूळच्या सांगली जिल्ह्यातील कंथे गावच्या अप्पासाहेब इरमल याची! वडील शेतमजूर, हातावरचे पोट... आपण सैनिक झाल्यानंतर घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर होईल व आपलेही देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेने तो रत्नागिरीत भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आला. मैदानावरील सगळ्या चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाला. त्यानुसार १६ फेब्रुवारीला होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्रही त्याच्या हातात मिळाले होते.