शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ड्रेनेज पाईपला धडकून दुचाकीवरील सख्खे भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:28 IST

कोल्हापूर : सीपीआर ते कसबा बावडा रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील चिपडे सराफ दुकासमोर रस्त्यावर टाकलेल्या ड्रेनेज पाईपला भरधाव दुचाकी धडकून रविवारी सायंकाळी सख्खे भाऊ जागीच ठार झाले.योगेश महादेव घाटगे (३२, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) आणि तेजस (२८) अशी त्यांची नावे आहेत. दुचाकी इतकी भरधाव होती की सातफुट पाईपमधून ती ...

ठळक मुद्देखानविलकर पेट्रोल पंपाशेजारी अपघात महानगरपालिकेचा निष्काळजीपणाअपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे पाच वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण

कोल्हापूर : सीपीआर ते कसबा बावडा रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील चिपडे सराफ दुकासमोर रस्त्यावर टाकलेल्या ड्रेनेज पाईपला भरधाव दुचाकी धडकून रविवारी सायंकाळी सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

योगेश महादेव घाटगे (३२, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) आणि तेजस (२८) अशी त्यांची नावे आहेत. दुचाकी इतकी भरधाव होती की सातफुट पाईपमधून ती आरपार गेली. अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.योगेश घाटगे हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचा भाऊ तेजस सेंट्रींगची कामे करीत होता. रविवारी सकाळी दोघेही चहा-नाष्टा करुन काम बघून येतो म्हणून दुचाकीवरुन बाहेर पडले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी कसबा बावड्याहून सीपीआरकडे भरधाव येत होती.खानविलकर पेट्रोलपंपाशेजारील चिपडे सराफ दुकानासमोर येताच रस्त्याकडेला असलेल्या ड्रेनेजच्या सिमेंट पाईपला दुचाकी घडकली. त्यामध्ये दोघांच्याही छातीला, तोंडाला मार लागला. त्यात दोघे जागीच ठार झाले. त्यांची दुचाकी इतकी भरधाव होती, की ती सात फुट पाईपमध्ये आरपार घुसली. मोठा आवाज झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक मदतीसाठी धावले. दोघांचेही मृतदेह सिमेंटच्या दोन्ही पाईपमध्ये अडकून पडले होते.अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची वर्दी शाहूपुरी पोलीसांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी आले. योगेश घाटगे हा जिवंत असल्याचे समजून त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळावरील पंचनामा करताना दोघे सख्खे भाऊ असल्याचे समजले.पोलिसांनी त्यांच्या खिशामध्ये मिळालेल्या मोबाईलवरुन नातेवाईकांशी संपर्क साधून बोलवून घेतले. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी ही वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दुचाकी बाहेर काढून ती शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे नेली.महापालिकेचा निष्काळजीपणागेल्या दोन महिन्यापासून याठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील ड्रेनेजचे काम सुरु आहे. रस्त्यापलिकडे दहा फुट खोल ड्रेनेज लाईन उघडी आहे. निधी अभावी हे काम रखडले आहे. या खड्डयात पडून अपघात होवू नये, यासाठी संबधीत ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला ड्रेनेज पाईप लाईनचे सिमेंटचे नळे ठेवले आहेत. त्यामुळे

याठिकाणी कसबा बावड्याकडून दसरा चौक, सीपीआरकडे जाणाºया वाहनांना अडथळा येत होता. जीव मुठीत घेवूनच येथून जावे लागत होते. चार दिवसापूर्वी याठिकाणी अपघात होवून दोघेजण जखमी झाले होते. त्यापोठापाठ हा मोठा अपघात झाल्याने महापालिका प्रशासन व ठेकेदाराच्या निष्काळजीपणा या दुर्घटनेला जबाबदार असल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण

सीपीआर चौक ते कसबा बावडा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सुरु असताना खानविलकर चौकात आयआरबी कंपनीने याठिकाणी खुदाई करुन ठेवली होती. त्यामध्ये दूचाकीसह पडून दोघा भावांचा मृत्यू झाला होता. या वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण या दूर्घटनेवरुन नागरिकांना झाली.