शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मेधा मेहंदळे : पर्यटन उद्योगाला मिळणार चालना

By admin | Updated: April 11, 2016 00:53 IST

आडेत उभं राहतंय विवेकानंद स्मारक

गुहागर : दापोली तालुक्यातील आडे येथे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभी राहत आहे. कोकणातील माणसांना विवेकानंद स्मारक पाहता यावे, त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, अशी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉ. मेधा मेहंदळेनी ही इमारत उभी केली आहे. विवेकानंद स्मारकामुळे आडे येथे पर्यटन व्यवसाय देखील वाढणार आहे. दापोली तालुक्यातील आडे हे गाव पर्यटनदृष्ट्या विकसीत आहे. तेथे डॉ. मेधा मेहंदळे या विवेकानंद स्मारक उभारत आहेत. या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे स्मारकाचे संपूर्ण बांधकाम कोकणातील पाऊस, दमट हवामान आणि वाळवीपासून सुरक्षित राहिल, अशी प्रक्रिया केलेल्या लाकडामध्ये होत आहे. स्मारकामध्ये कन्याकुमारी देवीची मूर्ती व विवेकानंदांचा सात फुटी ब्राँझचा पुतळा बसविण्यात येणार आहे. वडील सीताराम गणेश देसाई हे मुंबईतील रुपारेल आणि मिठीबाई महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख होते. तसेच मुबंई विद्यापीठाचे पीएच. डी.चे मार्गदर्शक होते. मुद्गल पुराणासह अनेक संस्कृत ग्रंथाचा, ऋचांचा मराठी भाषेत ओवीबध्द रुपांतर सीताराम देसाई यांनी केले आहे. दैनंदिन साईबोध, दैनंदिन दासबोध, देवी महात्म्य, सुभाषित मधुघट ग्रंथ, सुबोध कथा, अष्टविनायक महात्म्य अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘तिळा दार उघड’ या त्यांच्या पुस्तकाला युनेस्को पुरस्कार मिळाला आहे. या स्मारकाबद्दल बोलताना डॉ. मेधा मेहंदळे म्हणाल्या की, कोकणातील वयस्कर लोकांना कन्याकुमारीपर्यंत जाणं शक्य होत नाही. त्यासाठी कोकणात विवेकानंदाचे स्मारक बांधून त्याच्या कार्याचा प्रसार करावा. विवेकानंदानी सांगितलेलं विश्वबंधुत्वाचं तत्वज्ञान जनसामान्यांना कळावे आणि या ज्ञान मंदिरातून प्रगत भारत घडावा, अशी माझी आई कुसुम देसाई हिची इच्छा होती. हे स्मारक इंदापूरचे विक्रांत सप्रे बांधत आहेत. स्मारकातील स्वामी विवेकानंद आणि डॉ. सी. ग. देसाई यांच्या पुतळ्यांचे काम सुप्रसिध्द शिल्पकार जयेंद्र व जयप्रकाश शिरगावकर करत आहेत. स्मारकगृहाचे रेखांकन सुप्रसिध्द चित्रकार चंद्रशेखर संत यांनी केले आहे. यांच्यासारखी दिग्गज मंडळी आणि आडे ग्रामस्थांच्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तक प्रदर्शन या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी होणार असून, त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १३ व १४ एप्रिल रोजी विवेकानंद केंद्राच्यावतीने पुस्तक प्रदर्शन आणि विक्री केंद्र आडे येथे सुरू राहणार आहे.