नवे पारगाव : तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून साजरी झाली.
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, अकॅडमिक इन्चार्ज पी. डी. ऊके, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, प्रा. संदीप पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, अकॅडमिक इन्चार्ज, प्रा. आर. आर . पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
२३ डीवायपी, तळसंदे
फोटो ओळी : तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलात प्रतिमापूजन करताना प्राचार्य डॉ. सुहास पाटील.