शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीच्या लाईनमध्ये डझनभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

कसबा बावडा -लाईन बझार, आरक्षण : ( सर्वसाधारण ) रमेश पाटील कसबा बावडा : कसबा बावड्यातील एकूण ...

कसबा बावडा -लाईन बझार, आरक्षण :

( सर्वसाधारण )

रमेश पाटील

कसबा बावडा : कसबा बावड्यातील एकूण सहा प्रभागांपैकी सर्वसाधारण गटासाठी खुले झालेले जे दोन प्रभाग आहेत, त्यातला एक प्रभाग म्हणजे कसबा बावडा- लाईन बझार प्र. क्र. ४. हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने या प्रभागातून महापालिका गाठण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. डझनभराहून अधिक इच्छुकांनी आतापासून तयारी सुरू केल्याने या प्रभागात उमेदवारी देताना नेत्यांची मोठी कसरत होणार आहे. विशेष म्हणजे बाहेरील प्रभागांतील इच्छुकांनीही या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या प्रभागात काँग्रेसकडून सर्वाधिक इच्छुक आहेत.

मागील निवडणुकीत या प्रभागाचे नेतृत्व काँग्रेसच्या माधुरी लाड यांनी केले होते. यावेळी लाड यांनी अपक्ष गीतांजली चौगले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. ताराराणी व शिवसेना उमेदवाराला अपेक्षित मते घेता आली नव्हती. यंदा माधुरी लाड व त्यांचे पती पुन्हा या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. माजी स्वीकृत नगरसेवक मोहन सालपेही या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. महालक्ष्मी दूध संघाचे संचालक, बावडा व्यापारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे चेअरमन सचिन विलास पाटील, श्रीराम सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रमोद दिनकर पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण जनसंपर्क अधिकारी बजरंग रणदिवे, उद्योजक सुरेश यशवंत चौगले, ताहीर हाजीरफिक शेख, रामकृष्ण निवृत्ती जाधव, योगेश यशवंत निकम, अप्पा कुंभार, सचिन चौगले यांनीही या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत सुरेश चौगले यांच्या पत्नी गीतांजली चौगले रिंगणात होत्या. प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने अनेकजण या प्रभागातून नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. भाजप-ताराराणी, शिवसेना, राष्ट्रवादी यांचेही या प्रभागात उमेदवार असणार आहेत. विशेष म्हणजे कसबा बावड्यातील सर्वांत जास्त उमेदवार रिंगणात असलेला हा प्रभाग आहे. उमेदवारांची ही बहूगर्दी पाहता या प्रभागातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता आहे. सध्या या प्रभागातील इच्छुकांनी जागोजागी आतापासूनच डिजिटल फलक झळकावित उमेदवारीवर दावा सांगितला आहे, तर अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते: १) माधुरी लाड (काँग्रेस) १९४४ (विजयी)

२) गीतांजली चौगले (अपक्ष) ९५०, ३) संजना जाधव (ताराराणी) ६८३, ४) शाहीन काजी (शिवसेना) ६३०.

प्रभागातील सोडविलेले नागरिक प्रश्न :

प्रभागातील अनेक भागांत रस्ते, गटारीची ७५ ते ८० टक्के कामे केलेली आहेत. रेणुकानगर, त्र्यंबोलीनगर येथे पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. ऐच्छिक फंडातून प्रभाग एलईडी बल्बने उजळून टाकला आहे. प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेत एका ठिकाणी विरंगुळा केंद्र, तर एका ठिकाणी महिलांसाठी योगा हॉल बांधला आहे. तसेच पॅव्हेलियन ग्राउंडवर वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत. काही कामे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातूनही पूर्ण झाली आहेत.

प्रभागातील शिल्लक नागरिक प्रश्न :

पावसाळ्यात प्रभागात सर्किट हाऊस परिसरातील अनेक कॉलन्यांतील सांडपाणी लाईन बाजार येथील त्र्यंबोलीनगर, रेणुकानगर येथे येऊन तुंबते. त्यामुळे या दोन कॉलन्यांतील अनेक घरांत दोन फुटांहून जास्त पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्याची निर्गत होण्यासाठी मुख्य रस्त्यावरील रेणुका मंदिर येथे मोठे चॅनेल बांधून या पाण्याची निर्गत करणे गरजेचे आहे. मात्र, या कामाकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. पावसाळ्यात तुंबत असलेले पाणी या दोन कॉलन्यांतील मोठी समस्या बनली आहे. याशिवाय प्रभागातील काही कॉलन्यांतील रस्ते पूर्ण झालेले नाहीत. काही ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

कोट :

प्रभागात तब्बल चार कोटींची विकासकामे केली आहेत. यामध्ये रस्ते, गटारी, चॅनेल यांचा समावेश आहे. प्रभागातील रेणुकानगर, त्र्यंबोलीनगर येथे पाईपलाईन टाकून पाण्याची सोय केली आहे. पॅव्हेलियन ग्राउंडवर वॉकिंग ट्रॅक बांधला आहे. तसेच इथे बसण्यासाठी बाकडी व ओपन जिम उभारली आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होतो. चार नंबर फाटक येथे हॉलिबॉल कोर्ट उभारले आहे. श्रीराम उद्यानातही अनेक सुधारणा केल्या आहेत. प्रभागातील चार शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. प्रभागात भरपूर विकासकामे केल्याने मी माझ्या कामावर समाधानी आहे.

माधुरी लाड, नगरसेविका प्र. क्र. ४

फोटो: प्रभाग क्रमांक ४ कसबा बावडा

सखल भाग व त्यात अरुंद गटारी यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याची व्यवस्थित निर्गत होत नसल्याने प्रभागातील त्र्यंबोलीनगर, रेणुकानगर या सकल भागांत पाणी नेहमी तुंबलेले असते.