शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मुलांना नव्हे, घ्यायचा असतो त्यांच्या आई-वडिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

कोल्हापूर : हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिला जातो. मुलाची इच्छा असो ...

कोल्हापूर : हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिला जातो. मुलाची इच्छा असो वा नसो आम्ही लहानपणापासून मुलाला सांभाळलो, त्याचे शिक्षण केले, खस्ता खाल्ल्या आणि मुलगी येऊन संसार करणार मग आम्हाला काही नको का, अशी मुलांच्या पालकांची मानसिकता आहे. दुसरीकडे मुलीला सासरी त्रास होऊ नये, तिची हौस मौज व्हावी म्हणून मुलीचे पालकदेखील हुंडा देतात... दोन्ही बाजूंच्या या चुकीच्या रुढीमुळे अजूनही हुंड्यासाठी छळ आणि हुंडाबळीसारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

मुलाचे लग्नाचे वय झाले की वधुसंशोधनाची माेहीम सुरू होते. मुलगी शिकलेली, सुसंस्कृत, गृहकर्तव्यदक्ष असावी या सगळ्यांबरोबरच तिच्या माहेरी आर्थिक सुबत्ता असावी, ही अपेक्षा मुलाच्या कुटुंबीयांची असतेच. त्यांनी लग्नाचा खर्च बरोबरीने करावा, हुंडा म्हणनू रोख रक्कम नाही दिली तरी मुलीच्या अंगावर दहा तोळे सोने घालावे, मुलाला चेन, अंगठी हवी, कुटुंबीयांचा मानपान, गाडी, फ्लॅट, नोकरी लावून देणे अशा अनेक पद्धतीने आजही हुंडा घेतला आणि दिला जातोच. इकडे मुलगी उपवर झाली की पालकांना तिचं लग्न होऊन सुखी संसार चालेपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो. आपली मुलगी तिथे सुखाने नांदू शकेल ना, तिला सासरची माणसं त्रास देणार नाहीत ना असे एक ना अनेक प्रश्न पडलेेले असतात. त्यामुळे मुलीचे पालक त्यांची ऐपत असो वा नसो मुलीच्या लग्नात काही कसूर राहू नये म्हणून झटतात. प्रसंगी कर्ज काढून मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करतात.

--

हुंड्यासाठी छळाच्या १७८ तक्रारी

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे विवाहितेच्या छळाच्या तक्रारी कमी होत्या. यंदा मात्र गेल्या आठ महिन्यांत हुंड्यासाठी छळाच्या (कलम ४९८ अ) या कलमाखाली १७४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. ६ प्रकरणांमध्ये हुंडाबळीचे गुन्हे दाखल झाले आहेत. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे या कलमाखाली ३ तक्रारी आल्या आहेत.

---

मुलांच्या मनात काय?

मुलांना हुंडा नकोच असतो. पण आई-वडिलांना वाटतं की, आपण लहानपणापासून मुलाला वाढवलं, त्याचे शिक्षण केले. एवढा सगळा खर्च केला, नोकरी लावली, आता मुलगी येऊन संसार करणार तर तिने लग्नात काही घेऊन यावे, अशी अपेक्षा असते.

अमित चौगले (आरे. ता. करवीर)

--

हुंडा घेऊन मुलगी आणणे म्हणजे पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी करण्यासारखा प्रकार आहे. मुलगी ही वस्तू नाही. ती स्वत:चं घर, आई-वडील सोडून सासरी येते, आयुष्यभर नांदते आपल्याच सुनेकडून हुंडा घेणे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे.

अभिजीत भाटले (राधानगरी)

--

मुलांच्या पालकांना काय वाटते?

मुलाच्या शिक्षणावर पैसा खर्च केला म्हणून मुलीकडून हुंडा घेणे चुकीचे आहे. तसा खर्च मुलीच्या पालकांनाही येतच असतो. हुंडा घेणारादेखील अनेकदा मुलीचा बापही असतोच. लग्न हा दोन कुटुंबांना जोडणारा विधी आहे, हुंडा मागून परस्परांची पाकीटमारी केली जाऊ नये.

सुरेश कांबळे (देवाळे. ता. करवीर)

---

नवी सून सोन्याच्या पावलांनी आपल्या घरी येते, ती शिकलेली, सुसंस्कृत असावी आणि कुटुंबाला एकसंध बांधून ठेवणारी असावी, हाच आजच्या काळातला खरा हुंडा आहे असे मी मानते. तिला मन मोकळं करण्यासाठी, चुकलं तर हक्काने सांगणारी माणसं असावीत.

अनुराधा जाधव (सरदार पार्क, कोल्हापूर.)

--

मुलींच्या मनात काय

मुलाच्या पालकांचीच हुंड्याची अपेक्षा असते, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं असतं एवढंच. कुणाला गाडी, फ्लॅट, दागिने हवे असतात. हे प्रमाण सुशिक्षित कुटुंबांमध्ये जास्त आहे. गरज असो वा नसो या गोष्टी स्टेटस सिम्बॉल म्हणून बघितल्या जातात. ही मानसिकता बदलली पाहिजे.

शार्दुली दळवी (मंगळवार पेठ, कोल्हापूर.)