शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे घरांची पडझड

By admin | Updated: March 16, 2015 00:10 IST

अंकलखोप परिसर : वादळी वाऱ्यामुळे पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त

सांगली : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवकाळी पावसाने रविवारी पहाटेपर्यंत मुक्काम केला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घरांची पडझड होतानाच अंकलखोप परिसरातील पपई आणि केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. रविवारी सकाळी नुकसानीचे हे चित्र पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला. शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत धुडगूस घातला. चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पलूस तालुक्यातील अंकलखोप व परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने दोन घरांची पडझड झाली. शेतातील घरांचे छत उडून गेले, तर ऊसतोडणी कामगारांच्या पालीही उडून गेल्या. शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग अजूनही कायम असून, शनिवारी मध्यरात्रीपासून तासगाव, जत, विटा, आटपाडी, वाळवा तालुक्यांमध्ये पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. रविवारी दिवसभर प्रचंड उकाड्यासह ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते.शनिवारी मध्यरात्री पुन्हा खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना फटका बसला. मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)२४ तासांत १९ मि.मी. पाऊस सांगलीमध्ये रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांमध्ये १९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.४तासगाव : ४.८ मि.मी.४कवठेमहांकाळ : १.६ मि.मी. ४जत : ०.४ मि.मी.४खानापूर : ५ मि.मी.४आटपाडी : २ मि.मी.४पलूस : ५.५ मि.मी.४वाळवा : ०.२ मि.मी.जिल्ह्यातील एकूण नोंद १९.५ मि.मी. (सरासरी : २ मि.मी.)