राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माऊली पुतळ्यानजीक असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून शुक्रवारी रात्री साजिद शेख या युवकावर कुकरी व चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी सराईत गुन्हेगार चिन्या ऊर्फ संदीप हळदकर व त्याच्या तीन साथीदारांनी हल्ला केला. त्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी जाऊन पोलीस निरीक्षक सीताराम डुबल व पोलीस अंमलदार युवराज पाटील यांनी धाडसी कारवाईत या तिघांना शस्त्रांसह ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल जनतेतून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली. याची दखल घेत सोमवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस निरीक्षक डुबल व पोलीस अंमलदार पाटील यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते.
फोटो : ०३०५२०२१-कोल-पोलीस
ओळी : पेट्रोलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून युवकावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पकडल्याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल व युवराज पाटील यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते.