शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरच्या रिक्षा व्यावसायिकांसमोर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

विनोद सावंत लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘भाडेवाढ करावी तर प्रवासी पाठ फिरविणार’, ‘वाढ केली नाही तर रोजच्या उत्पन्नावर ...

विनोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘भाडेवाढ करावी तर प्रवासी पाठ फिरविणार’, ‘वाढ केली नाही तर रोजच्या उत्पन्नावर परिणाम’असे दुहेरी संकट कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिकांसमोर आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडूनच थेट मदत मिळावी, अशी मागणीही जोर धरत आहे. मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपयांची भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही रिक्षा व्यावसायिकांचा भाडेवाढीचा विषय चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. त्याचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. दरम्यान, कोरोनात लॉकडाऊनमुळेही रिक्षा व्यवसाय करता आला नाही. त्यांचे बँकेतील कर्जाचे हप्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. रिक्षा संघटनांकडून शासनाकडे आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सर्वांचा विचार करून मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपये भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, दरवाढीबाबत फारसे कोणी उत्सुक दिसत नाही.

------------------------

कोट...........

भाडेवाढ मिळेल पण प्रवाशांचाही विचार करावा लागेल. अगोदरच कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात आहे. प्रवाशीच आले नाही तर भाडेवाढ काय उपयोगाची आहे. यावर पर्याय म्हणजे रिक्षा व्यावसायिकाचा खर्च कमी करणे गरजेचा आहे. सीएनजीवर रिक्षा केल्यास खर्च कमी होणार आहे. यासाठी शासनाने सीएनजी पंप कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करावेत.

सुभाष शेटे, अध्यक्ष, करवीर ॲटो रिक्षा युनियन

---------------------------------------

कोट...........

वाढलेली महागाई, खर्च विचार करता भाडेवाढ करणे गरजेचे असले तरी व्यवहार्य नाही. रिक्षा व्यावसायिकांची स्थिती बिकट असली तरी कोरोनामुळे नागरिकही अडचणीत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी भाडेवाढ करणे सध्या तरी योग्य वाटत नाही.

मोहन बागडी, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा व्यावसायिक संघटना

रिक्षा व्यावसायिक दुहेरी संकटात

-------------------------------------------------------

सध्याची भाडे आकरणी

पहिल्या एक किलोमीटरसाठी २० रुपये तर त्या पुढील प्रत्येक एक किलोमीटरला १७ रुपये

-------------------------------------------------------

शहरात एकूण रिक्षा : ५५००

स्वत: मालकीच्या रिक्षा : ३५००

भाडेतत्त्वावर व्यवसाय करणारे : २०००

एलपीजी गॅसवरील रिक्षा : ३०००

सरासरी दिवसा उत्पन्न : १५० ते ३००