शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती, शिवज्योती नेण्यासाठी गर्दी करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:22 IST

Corona Panhala Shivjayanti Kolhapur- कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली.

ठळक मुद्देपन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंतीशिवज्योती नेण्यासाठी गर्दी करु नये

पन्हाळा - १९ फेब्रुवारी  रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि  पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते.मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.१९ फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. शिवजयंतीला अनेक गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत नेली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घ काळ वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून देखील शिवज्योत घेऊन जातात. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर ,सांगली, सातारा, पुणे यासह इतर जिल्ह्यातून शिवभक्त ऐतिहासिक पन्हाळगडावर दाखल होत असतात. यासोबतच, कर्नाटक राज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड, अथणी परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर येतात.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी येऊ नये, कोरोनाचा संसर्ग कमी असला, तरी त्याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेतला आहे.  शिवभक्तांनी पन्हाळगडावर न येत, आपल्याच गावी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करा, तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे.- रुपाली धडेल, नगराध्यक्ष,पन्हाळा.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर