शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

‘तिसऱ्या डोळ्या’साठी हवे आहेत देणगीदार !

By admin | Updated: December 16, 2014 23:52 IST

गडहिंग्लज नगरपालिका : ‘सीसीटीव्ही’साठी प्रायोजकांच्या शोधात

राम मगदूम - गडहिंग्लज --वाढती गुन्हेगारी व चौका-चौकांतील वाहतुकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी शहरातील प्रमुख दहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. वाढती गुन्हेगारी आणि तुलनेत पोलीस बळ कमी असल्यामुळे संभाव्य घटनांवर तत्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी नगरपालिकेला पत्र दिले आहे. याकामी सुमारे पाच लाखांचा खर्च अपेक्षित असून, नगरपालिका प्रायोजकांच्या शोधात आहे.अलीकडे शहरात सोनसाखळी चोरी, आठवडा बाजाराच्या दिवशी व बसस्थानकावरील पाकीटमारी, चोऱ्या, दरोडे आणि खून, आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढती गुन्हेगारी आणि मुख्य रस्त्यांवरील काही चौकांत होणाऱ्या वाहतुकीच्या दैनंदिन कोंडीमुळे पोलीस प्रशासन हतबल आहे. या पार्श्वभूमीवरच ‘सीसीटीव्ही’ची मदत घेण्याची कल्पना पुढे आली आहे.दिवसाढवळ्या धूमस्टाईलने महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्यांची चोरी, बाजार व गर्दीच्या ठिकाणी होणारी युवती व महिलांची छेडछाड, चोऱ्या, जबरी दरोड्यांसह भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत.शहरातील महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही बसविल्यास गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच अशा घटना घडण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. त्यासाठीच शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना पोलिसांनी पालिकेला केली आहे. मात्र, शासकीय निधी किंवा प्रायोजक मिळाले, तरच ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे.गडहिंग्लज शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेला पत्र दिले आहे.- रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक, गडहिंग्लजया चौकांत बसणार कॅमेरे !बसस्थानक , रजनीगंधा चौक, मराठा चित्रमंदिर, दसरा चौक, शिवाजी पुतळा, वीरशैव बँक, भगवा चौक, नेहरू चौक, कांबळे तिकटी, मार्केट यार्ड चौक.‘सीसीटीव्ही’ची गरज का?गडहिंग्लज तालुका कर्नाटकच्या सीमेवर आहे. सीमाभागातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गडहिंग्लजमध्ये गुन्हेगारांचीही नेहमी ये-जा असते. गुन्ह्यांच्या घटनांनंतर आणि त्यापूर्वी अनोळखी व संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनच सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात शहरातील बँका व पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. प्रायोजकांच्या सहकार्यातूनच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.- तानाजी नरळे, मुख्याधिकारी, गडहिंग्लज