शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बेलदार समाजाचा तहसील कार्यालयावर गाढवभेट मोर्चा

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

प्रलंबित मागण्या : भटक्या समाजावर अन्याय होत असल्याची कैफियत

दापोली : महाराष्ट्र राज्यातील दुर्लक्षित भटक्या बेलदार समाजाला आजही उपेक्षित जीवन जगण्याशिवाय पर्याय नाही. अशा या भटक्या समाजावर पूर्वी ब्रिटिश व आता प्रशासन अन्याय करीत आहे. समाजावरील अन्यायाच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेद्वारे मोर्चा काढण्यात आला. हर्णै येथील भटक्या बेलदार समाजाच्या झोपड्यांवर कारवाई करुन त्यांना बेघर करण्यात आले होते. अशा या बेघर कुटुंबांवरील अन्यायाच्या विरोधात राज्यातील पहिला गाढव भेट मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.हर्णै येथील १५ झोपड्यांवर तत्कालीन तहसीलदारांनी २००५ साली कारवाई करुन झोपड्या तोडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून गेली १० वर्षे हा भटका समाज बेघर जीवन जगत आहे. मात्र, शासनाने या समाजाची दखल घेतली नाही. प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी रवींद्र चव्हाण, अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली एकवटला. जोपर्यंत हर्णै येथील बेलदार समाजाला हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. (प्रतिनिधी)बेलदार समाजाच्या न्याय हक्कांसाठी आमचा लढा आहे. समाजाचे हक्क मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मात्र, १ महिना होऊन गेला तरी मुख्यमंत्री साधी दखल घेत नाहीत. निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना हात पुढे केला. परंतु हात मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातसुद्धा पुढे केला नाही. त्यामुळे फडणवीस यांनी या समाजाचा अपमान केला होता. संख्येने कमी आहोत म्हणूनही दखल घेतली जात नसेल परंतु आम्ही आमची ताकद नक्की दाखवू.- अध्यक्ष, बेलदार समाज, रवींद्र चव्हाण.ंभटक्या बेलदार समाजाकडून सरकारी जागेचा प्रस्ताव आल्यास नक्की योग्य तो विचार केला जाईल. २००५ला सरकारी जागेवरील बेकायदा घरे शासनाच्या आदेशानुसार तोडण्यात आली होती. बेलदार समाजाने सरकारी जागेचा प्रस्ताव दिल्यास त्यांना सरकारी जागा मिळण्यासाठी शासनकाडे प्रस्ताव पाठवू.- कल्पना गोडे, तहसीलदार