शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी दुकानदारांनाही पोलिसांचा दणका

By admin | Updated: August 9, 2016 01:12 IST

मालकांवर गुन्हा : टेंबे रोडवर ५० हजारांचे साहित्य जप्त

कोल्हापूर : येथील टेंबे रोडवरील दोन डॉल्बी दुकान मालकांवर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत रविवारी (दि. ७) गुन्हा दाखल केला. या दुकानातील डॉल्बी मशीन, मिक्सर साहित्य असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अरविंद इलेक्ट्रॉनिक्स व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स अशी या डॉल्बी तयार करून विकणाऱ्या दुकानांची नावे आहेत.याप्रकरणी संशयित दुकानमालक हिमांशू अरविंद धडाम (वय २९, रा. १४७६ बी वॉर्ड, काळकाई गल्ली, शिवाजी पेठ), सागर नारायण गुणाजी (४२ , रा. प्लॉट नंबर ८९, मंगेशकरनगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याचे पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई सुरू आहे. त्याचवेळेला आता पोलिसांची नजर थेट डॉल्बी तयार करणाऱ्या दुकानादारांकडेही वळली आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘टेंबे रोडवर शिवाजी स्टेडियमच्या गाळ्यात डॉल्बी साऊंड सिस्टीम विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानामध्ये खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांना साऊंड सिस्टीमची चाचणी देताना मोठ्याने आवाज करून दाखविला जातो. त्यामुळे दुकानाच्या समोरील रस्त्यावर ये-जा करणारे व परिसरातील नागरिकांना डॉल्बीच्या आवाजाचा त्रास होतो. यासंबंधी पोलिसांनी ८ जुलैला या विक्रेत्यांची पोलिस ठाण्यात बैठक घेऊन ध्वनिप्रदूषण कायद्याबाबत माहिती दिली होती. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.शनिवारी टेंबे रोडवरील अरविंद व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये मोठ्या आवाजने डॉल्बी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोन दुकानातील आवाजाची डेसिबल मशीनच्या साहाय्याने खात्री केली. त्यावेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. म्हणून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले.इचलकरंजीत चौघांवर गुन्हाइचलकरंजी : विणकर दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बी लावल्याप्रकरणी शिवाजीनगर आणि गावभाग पोलिसांनी डॉल्बी मालकासह चौघांवर सोमवारी गुन्हा दाखल केला. या चौघांना न्यायालयाने एकूण २३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.सुनील विलास मेटे (वय ४०), अभिषेक राजेंद्र पेटकर (२३, रा. गावभाग), दीपक अशोक वाघमोडे (रा. आमराई मळा) व डॉल्बीमालक सुभाष तुकाराम बुचडे (४३, रा. गांधी कॅम्प) अशी चौघांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, एस.बी.सी. संघर्ष समितीच्यावतीने रविवारी विणकर दिनानिमित्त छत्रपती शाहू पुतळा ते गांधी पुतळा या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच मिरवणुकीत डॉल्बीही लावण्यात आला होता. त्यामुळे वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने प्रत्येकी ३७५० व २००० असा दंड ठोठावला आहे. हा एकूण दंड २३ हजार रुपये होतो. तसेच यापुढेही विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करून डॉल्बी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे व सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)