शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमध्ये डॉल्बीमुक्तीचा नारा

By admin | Updated: August 28, 2016 00:35 IST

उत्स्फूर्त स्वागत : सानिका स्पोर्टस्च्या आवाहनाला प्रतिसाद देत मुरगूड विद्यालयाची प्रबोधन फेरी

मुरगूड : मुरगूड शहर व परिसरामध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुरगूडमधील सानिका स्पोर्टस्ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुरगूड विद्यालय (ज्युनि. कॉलेज)च्या विद्यार्थ्यांनी शनिवारी उत्साहात डॉल्बीमुक्तीचा नारा दिला. ‘डॉल्बी टाळा, हृदयरोगाला आळा’, ‘डॉल्बीला भूलला, नोकरीला मुकला’, अशा घोषणा देत हातामध्ये लक्षवेधी फलक घेत संपूर्ण शहरातून प्रबोधन फेरी काढली. यावेळी अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, व्यापारी, नागरिक यांनी या फेरीचे उत्स्फूर्त स्वागत केले. डॉल्बीमुक्तीसाठी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी सानिका स्पोर्टस्च्या माध्यमातून तरुण मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी शालेय विद्यार्थ्यांची शहरातून प्रबोधन फेरी काढली. ही फेरी मुरगूड विद्यालयपासून बाजार पेठ, राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, जवाहर रोड मार्गे एसटी स्टँड परिसर, तुकाराम चौक मार्गे पोलिस ठाण्याजवळून परत शाळेमध्ये आली. मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष सतोषकुमार वंडकर याच्या हस्ते या प्रबोधन फेरीचे उद्घाटन झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशालेचे प्राचार्य पी. व्ही. शिंदे यांनी डॉल्बीच्या वापराचे तोटे मनोगतातून सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, नगरसेवक शिवाजी इंदलकर, माजी नगरसेवक मोहन कांबळे, संदीप सूर्यवंशी, उपप्राचार्य जे. डी. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. पाटील, पी. बी. लोकरे, संजय सूर्यवंशी, अमित भोई, एस. आर. सुदर्शनी, पी. टी. भोसले, एम. बी. टेपुगडे, एस. एस. कळंत्रे, सुनील बोरवडेकर, विजय पाटील, अभिजित पोवार, भीमराव गुरव, आदी प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)