शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून डॉल्बी हद्दपार होणार

By admin | Updated: September 16, 2015 01:13 IST

गणेशोत्सव : कोल्हापुरातील ७८ मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिसांचे आवाहन

कोल्हापूर : डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंगळवारी शहरातील तब्बल ७८ मंडळांनी केला आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे यंदा शहरातील गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार होणार आहे. शहरातील महत्त्वाच्या चारही पोलीस ठाण्यांत स्वत:हून मंडळे डॉल्बी लावणार नसल्याची हमी देत आहेत. शहर शिवसेना यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आठ मंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांना, तर उर्वरित ७० मंडळांनी संबंधित पोलीस ठाण्याला कळविले आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वृद्ध, हृदयविकारग्रस्त, बालके यांच्या आरोग्याला डॉल्बीचा आवाज घातक आहे. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासन अधिकाधिक मंडळांनी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सामाजिक संघटनाही आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसाद देऊन मंडळे स्वत:हून डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्ये वाजविण्याचा निर्णय घेत आहेत. गणरायाचे आगमन जवळ येईल तसे डॉल्बीमुक्तीचा निर्णय घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढते आहे. मंगळवारी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या मंडळांची नावे अशी : गणेश, ईगल (राजारामपुरी बारावी गल्ली), गोकुळ (राजारामपुरी दहावी गल्ली), आदर्श (राजारामपुरी नववी गल्ली), जय शिवराय (राजारामपुरी चौथी गल्ली), पॅट्रियट (काटकर कॉलनी), चॅन्सलर, भगवा (दौलतनगर), पाटाकडील तालीम, बोडके गल्ली, सनगर, बजापराव माने, लेटेस्ट, दत्ताजीराव काशीद (मंगळवार पेठ), खंडोबा, महाकाली (शिवाजी पेठ), नाथा गोळे तालीम (लाड चौक), नंदी (रंकाळा टॉवर), जय शिवराय (लाड चौक), छत्रपती शिवाजी (शिवाजी चौक), रेसकोर्स महादेव (रेसकोर्स), प्रतापसिंह (काळकाई), राजे संभाजी (कोळेकर तिकटी), भाई ग्रुप (शाहू बँक), नवविकास (दैवज्ञ बोर्डिंग), चाणक्य (सिद्धाळा गार्डन), मंगळवार पेठ (मिरजकर तिकटी), पूल गल्ली (रविवार पेठ), दयावान, हिंदवी (शिवाजी पेठ), दिलबहार (रविवार पेठ), झुंजार (सानेगुरुजी), बालगोपाल (मंगळवार पेठ), कोब्रा, फिरंगाई, अर्जुन, गणेश, संतोष, एकता (गणेश कॉलनी), जासूद (जासूद गल्ली, मंगळवार पेठ), जुना बुधवार पेठ, संरक्षण (जोशी गल्ली, शुक्रवार पेठ), चांदणी चौक (रविवार पेठ), हाय कंमाडो (जुना बुधवार पेठ), क्रांतिवीर राजगुरू (डांगे गल्ली), न्यू सम्राट (शनिवार पेठ), सत्यनारायण (पद््मा चौक, शाहूपुरी), शिवशक्ती (फोर्ड कॉर्नर), साईबाब ग्रुप (रविवार पेठ), गणेश स्वराज्य (पेरीना कॉर्नर, लक्ष्मीपुरी), जय शिवराय (रविवार पेठ), महाराजा (शिवाजी पेठ), लाल चौक (पान लाईन लक्ष्मीपुरी), शिवाजी (शिवाजी चौक), स्वयंभू (लक्ष्मीपुरी), भगवा रक्षक (रविवार पेठ), मृत्युंजय (शनिवार पेठ), नरसोबा (डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ), सोल्जर (तोरस्कर चौक), स्थानिक म्हेतर (रविवार पेठ), आर्मी (आंबेडकर गल्ली), मास्टर (तारा चेंबर्स, लक्ष्मीपुरी), भगवा ग्रुप (टायटन शोरूम), गणेश, सी वार्ड (साळी गल्ली, सोमवार पेठ), दसरा चौक (साधना कॅपेसमोर लक्ष्मीपुरी), अष्टविनायक (पोस्टर गल्ली, शनिवार पेठ), शिपुगडे (बुधवार पेठ), रणझुंजार (परीट गल्ली), तोरणा (शनिवार पेठ), म्हसोबा (एसडीपीओ आॅफिस), न्यू अमर (शनिवार पेठ), ऋणमुक्तेश्वर (शाहू उद्यान, गंगावेस), ओम (गवळी गल्ली), सर्वोदय (डंगरी गल्ली), रोहिडेश्वर (सारस्वत बँकेसमोर), डांगे गल्ली (जुना बुधवार पेठ). (प्रतिनिधी)