शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका सभेत ‘डॉल्बी’चा गोंधळ

By admin | Updated: August 12, 2014 00:39 IST

इचलकरंजीचे राजकारण : सत्तारूढ कॉँग्रेस व विरोधी ‘शविआ’मध्ये खडाजंगी

इचलकरंजी : गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याबाबत सत्तारूढ कॉँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी, असा आग्रह विरोधी शहर विकास आघाडीने धरल्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अशा गोंधळातच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा केली आणि सभा संपुष्टात आली.नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विविध प्रकारच्या १४ विषयांवर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा बिरंजे यांनी आज, सोमवारी सभा आयोजित केली होती; पण सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी, ऐनवेळच्या विषयाची पत्रिका सभा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी मिळणे आवश्यक आहे. परिणामी, सभेसमोर ऐनवेळचे विषय ठेवू नयेत, असा आक्षेप घेतला. मात्र, ऐनवेळचे विषय नागरी हिताचे असल्याने सभेसमोर ठेवण्यात आले आहेत, अशा नगराध्यक्षा बिरंजे यांनी दिलेल्या उत्तराने चोपडे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी या विषयांना आक्षेप घेतला आणि गोंधळास सुरुवात झाली.सत्तारूढ व विरोधी बाजूचे नगरसेवक एकाच वेळी बोलत असताना शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याचा विषय ऐरणीवर आणला. सत्तारूढ कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष रणजित जाधव हे गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याच्या समर्थनार्थ झालेल्या बैठकीस उपस्थित होते, तर त्यापाठोपाठ पोलिसांनी डॉल्बीच्या विरोधात घेतलेल्या बैठकीतसुद्धा गटनेते कलागते यांनी हजेरी लावली. याचा परिणाम म्हणून गणेशोत्सवावेळी डॉल्बी लावण्याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. म्हणून हा विषय ऐनवेळच्या विषयात घेऊन यावर चर्चा व्हावी, असा आग्रह जाधव यांनी धरला. तेव्हा जाधव यांच्या विषयास सत्तारूढ कॉँग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. तो पाहून शहर विकास आघाडीचे सर्वच नगरसेवक उठून एकाचवेळी बोलू लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॉँग्रेसचे नगरसेवकही उठले. असा गोंधळ सुरू असतानाच विषयपत्रिकेचे वाचन करून नगराध्यक्षा बिरंजे यांनी सभा संपवल्याचे जाहीर केले.सभेच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये यश मिळविणारे खेळाडू ओंकार ओतारी, गणेश माळी, चंद्रकांत माळी व राही सरनोबत यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच येळ्ळूर येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध झाला.