शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड परिसरात डॉल्बीवर बंदी

By admin | Updated: August 25, 2016 00:42 IST

या आवाजाचा ध्वनी प्रदूषणाबरोबर विशेषत: लहान मुले, वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

कुरुंदवाड : येथील पोलिस ठाण्याने डॉल्बी विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार असून, डॉल्बीवर थिरकणाऱ्या तरुणाईतून नाराजी व्यक्त होत असली तरी या निर्णयाचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दहीहंडी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सवसह विविध कार्यक्रम, उत्सव, मिरवणुकीत तरुणार्इंना डॉल्बीचे प्रमुख आकर्षण असते. संयोजक, राजकीय मंडळी तरुणांना आकर्षित करण्यासाठी डॉल्बीसह सढळ हाताने खर्च करतात. रिमिक्स व प्रमाणबह्य डॉल्बीच्या आवाजावर बेधुंद होऊन तरुणाई नाच करते. मात्र, या आवाजाचा ध्वनी प्रदूषणाबरोबर विशेषत: लहान मुले, वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. डॉल्बीवर व त्याच्या प्रमाणबाह्य आवाजावर शहरात बंदी घातल्याने डॉल्बी व्यावसायिकांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला आहे. वेगवेगळ्या उत्सवाच्या मिरवणुकीत पोलिसही तरुणांच्या उत्साहाला प्रतिसाद देत डॉल्बी वाजवा; परंतु वाद करू नका. वाद झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या मंडळांना परवानगीच दिल्याने वाद केला नसला, तरी बेफाम आवाजामुळे ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत. कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी डॉल्बी विरोधात कडक भूमिका घेतली आहे. कोणत्याही प्रकारचा डॉल्बीचा आवाज घुमणार नाही, अन् त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील मंडळाचे पदाधिकारी, राजकीय नेत्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डॉल्बी मालकांनाही सूचना केल्या असून, सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. आपले लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित करून २७ गावांत ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांत पोलिस अधिकारी कदम यांनी बैठका घेऊन डॉल्बी विरोधात कारवाईचा इशारा दिल्याने तरुणाईत नाराजी आहे. (वार्ताहर)