शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणी जमीन देता का जमीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड ‌- गेल्या वीस वर्षांपूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड’ ओढयावर ...

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड ‌-

गेल्या वीस वर्षांपूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची

शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड’ ओढयावर आज लोंढा -नाला प्रकल्प

पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरुवात केल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे, पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली अशा २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन ' असे म्हणत आर्त हाक देत आहेत.

केळोशी बु.(ता. राधानगरी) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८मध्ये ५६०३.२२५ घनमीटर साठवण क्षमतेच्या मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात झाली.

प्रत्यक्षात काम दोन-तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात

धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध

केला होता. आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल, असा

हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता, पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या

शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या

शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व

कामास सुरुवात झाली.

या घटनेला आता जवळपास २०

वर्षे लोटली. संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनीच्या बदल्यात

जमिनी देऊ करा म्हणून या वीस वर्षांत किती हेलपाटे शासनदरबारी मारले याला

गणितच नाही. गेल्या चार वर्षांपासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत. त्यांची शेती हिरवाईने नटली आहे, पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून

स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही

उपेक्षितच आहेत. त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमीन म्हणत

आपले गाऱ्हाणे 'लोकमत 'कडे मांडले आहे.

जमीन शिल्लक असताना चालढकल का?

धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४, ८१२, ८२०, ९०५, ८८०, ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या

गटाचा पसंतीक्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर

प्रशासनानेच द्यावे.