शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत डॉक्टरचा बंगला फोडून लाखाचा ऐवज लंपास

By admin | Updated: June 7, 2015 00:33 IST

शहर पोलिसात फिर्याद

मिरज : येथील शल्यविशारद डॉ. विराज लोकूर यांचा बंगला फोडून चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. डॉ. लोकूर परदेश दौऱ्यावर गेले होते. डॉ. विराज लोकूर यांचा मिरज-सांगली रस्त्यावर भोकरे कॉलनीत बंगला आहे. डॉ. लोकूर कुटुंबीय गेले दहा दिवस युरोप दौऱ्यावर गेले होते. शुक्रवारी रात्री डॉ. लोकूर मिरजेत परत आल्यानंतर त्यांचा बंगला फोडून ऐवज लुटल्याचे निदर्शनास आले. डॉ. लोकूर यांनी परदेशी जाताना दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याने मौल्यवान ऐवज बचावला. चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपडे व साहित्य विस्कटले. १५ हजार रोख रक्कम, देवघरातील चांदीच्या मूर्ती, मोत्याची माळ, सोनी कंपनीचे दोन एलईडी टीव्ही असा लाखाचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. जाताना मुख्य दरवाजा आतून बंद करून दुसरा दरवाजा उघडून चोरटे पळून गेले. चोरट्यांचा रूमाल बंगल्यात सापडला. चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला. श्वानपथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र श्वानपथक बंगल्याच्या परिसरात घुटमळले. चोरीबाबत डॉ. विराज लोकूर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)