शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

मेघडंबरीचे काम लवकर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य विकास कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी शिल्पकार तसेच ठेकेदार यांना दिल्या.महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य विकास कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी शिल्पकार तसेच ठेकेदार यांना दिल्या.महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यासमवेत जाऊन समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम केले जात असलेल्या कार्यशाळेत जाऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी गटनेते सत्यजित कदम, राजसिंह शेळके, माजी नगरसेवक आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, ठेकेदार अभिजित जाधव, शिल्पकार किशोर पुरेकर, आदी उपस्थित होते.मेघडंबरीचे काम पूर्ण व्हायला किमान तीन महिने लागतील, असे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी यावेळी सांगितले. तथापि महापौर फरास यांनी जादा मजूर घ्या, रात्रं-दिवस काम करा; पण दि. १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करावे, अशी सूचना केली. समाधिस्थळ परिसरात करावयाची अन्य विकासकामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना केली.कास्टिंगचे काम ४ आॅक्टोबरनंतर सुरू!सिद्धार्थनगराला लागून असलेल्या नर्सरी बागेत छत्रपती शाहू महाराजांची समाधी बांधण्यात येत आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे समाधिस्थळावर दगडी मेघडंबरी तयार करायची होती; परंतु नंतर ती पंचधातंूची करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्याचे डिझाईन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत या मेघडंबरीचे क्ले मॉडेल तयार झाले आहे. प्रत्यक्ष जागेवर ही मेघडंबरी बसवून पाहिली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे दि. १ आॅक्टोबरला जागेवर प्रात्यक्षिक होईल. सर्व बाजूने ती जर व्यवस्थित उभी राहिली, तर मग त्याचे कास्टिंगचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे दि. ४ किंवा ५ आॅक्टोबरनंतर कास्टिंगचे काम सुरू होईल.