शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे जोडे आम्ही खायचे का ?

By admin | Updated: October 22, 2015 00:51 IST

सभापतींचा सवाल : ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची, अधिकाऱ्यांनी मजा मारायची

आजरा : आजरा तालुक्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठेल याची शाश्वती नाही. ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन मजा मारायची आणि तालुक्यातील लोकांचे जोडे आम्ही खायचे, असा प्रकार सुरू असून पाणीटंचाइच्या पार्श्वभूमीवर बेफिकीरपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत सभापती विष्णूपंत केसरकर यांनी जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त गावातील पाणीसाठ्याची व आवश्यक उपाययोजनेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील मलिग्रे येथील पाझर तलावाची गळती, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था याबाबत जोरदार चर्चा झाली. वारंवार बैठका घेऊनही जलसंधारणाचे अधिकारी कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल खदखदणाऱ्या रागाचा अखेर सभापती केसरकर यांच्याकडून उद्रेक झाला.मलिग्रे तलावाच्या बांधकामाचे काम लाखो रुपये खर्चून करण्यात आले; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम झाल्याने तलावात पाणीसाठा होत नाही. यामुळे मलिग्रे परिसरातील गावांचे पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी घालतात. पाण्याचा पत्ता नाही. कंत्राटदार पैसे मिळवून रिकामे झाले. अधिकारी काय करतात? चांगली कामे का होत नाहीत? पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न उपस्थित करीत कंत्राटदारांना पोसणे बंद करा, असा सल्ला दिला.तालुक्यात पाणीसाठा करता येणे शक्य आहे. पण, बंधाऱ्यांकरिता वापरले जाणारे बरगे सडले आहेत. कारणे सांगत बसू नका तर बरग्यांसाठी प्रयत्न करा, असेही सांगितले. पाणीटंचाई प्रश्नाबाबत हलगर्जीपणा केल्याची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्र ार करण्याचा इशाराही केसरकर यांनी दिला.चर्चेत कॉ. संपत देसाई, उपसभापती दीपक देसाई, जलसंधारणचे सहायक अभियंता एस. व्ही. दावणे यांच्यासह उपस्थितांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)पुन्हा अधिकारी गायबआजची बैठक पूर्व नियोजित असूनही गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी पुन्हा एकवेळ दांडी मारली. सभा सुरू झाल्यानंतर तासाभराने गटविकास अधिकारी आले. तर इतर अधिकारी नेहमीप्रमाणे भागात होते.सोहाळे बंधारा पैसेच नाहीतसोहाळे बंधाऱ्याच्या ठेकेदाराने सुमारे ३२ लाख रुपये खर्चून बऱ्यापैकी दुरुस्ती केली आहे; पण बिलेच न निघाल्याने पुढची कामे केलेली नाहीत. हा प्रकारही चिंताजनक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.