शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जगाचे नागरिक समजून संशोधन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 01:24 IST

सीराम रामकृष्ण : शिवाजी विद्यापीठामध्ये व्याख्यानात आवाहन

कोल्हापूर : तरुण संशोधकांना जागतिक पातळीवर नावलौकिक करण्याची संधी निर्माण झाली आहे. ते लक्षात घेऊन आपण फक्त देशाचेच नागरिक नसून जगाचे नागरिक आहोत, या भावनेने त्यांनी संशोधन कार्य करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूरचे (संशोधन) उपाध्यक्ष प्रा. सीराम रामकृष्ण यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्लीतील इंटरनॅशनल स्टडिज इन टेक्निकल एज्युकेशन (आएसटीई)तर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘बिल्डिंग इनोव्हेशन अ‍ॅन्ड इंटरप्रिन्युअरशीप’ असा त्यांच्या विषय होता. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार होते. ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई प्रमुख उपस्थित होते.देसाई म्हणाले, सध्या देशातील उच्च तंत्रशिक्षण क्षेत्र एका कठीण प्रसंगातून जात आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभाव जाणवत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठ सांगते म्हणून आपण संशोधन करतो तर संशोधन अंत:करणापासून झाले पाहिजे. पवार म्हणाले, नावीन्यपूर्ण संशोधनवृत्ती जोपासणे विद्यार्थ्यांनी जोपासावी. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी, ड्रोन, थ्रीडी प्रिटिंग अशा नव्या क्षेत्रात संशोधन करावे. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, एस. एन.भोसले आदी उपस्थित होते. ए. के. साहू यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले. संशोधनाला सहकार्य व्याख्यानानंतर प्रा. रामकृष्णा यांनी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे आदींसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील संशोधनाबाबत काही मदत लागल्यास संपर्क साधा, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूर तसेच अन्य संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.